आधी नन होण्यासाठी घेतलं ८ वर्ष ट्रेनिंग, अचानक करिअर बदलून झाली पॉर्न स्टार!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 01:43 PM2018-11-05T13:43:22+5:302018-11-05T14:13:31+5:30

एका कॉन्वेंटमध्ये तब्बत ८ वर्ष नन बनण्याचं ट्रेनिंग घेतलं. पण काहीतरी झालं.....

8 years of training before becoming a nun, a sudden star turned out! | आधी नन होण्यासाठी घेतलं ८ वर्ष ट्रेनिंग, अचानक करिअर बदलून झाली पॉर्न स्टार!

आधी नन होण्यासाठी घेतलं ८ वर्ष ट्रेनिंग, अचानक करिअर बदलून झाली पॉर्न स्टार!

googlenewsNext

आपल्या करिअरमध्ये अचानक धक्कादायक बदल करणारी एक मुलगी सोशल मीडियाच चांगलीच चर्चेत आली आहे. युडी पिनेडा असं या मुलीचं नाव असून तिने एका कॉन्वेंटमध्ये तब्बत ८ वर्ष नन बनण्याचं ट्रेनिंग घेतलं. पण काहीतरी झालं आणि अचानक तिने २२ वय असतानाच पॉर्न स्टार होण्याचा निर्णय घेतला. पिनेडा ही कोलंबियाची राहणारी असून फार कमी वयातच ती चर्चसाठी तयारी करत होती. 

लाडबिडल या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, आता तिने करिअरमध्ये ३६० डिग्रीचा बदल करत अॅडल्ट सिनेमात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. वेबसाइटसोबत बोलताना पिडेलाने सांगितले की, 'मी उरबामध्ये होती. तेव्हा आमच्या शाळेत एक नन आली आणि तिला पाहून मलाही नन होण्याची इच्छा झाली होती'.

त्यानंतर यु़डी पिनेडाने ननच्या ट्रेनिंगसाठी कॉन्वेंट जॉईन केलं आणि नन होण्यासाठी ८ वर्ष ट्रेनिंग केलं. चर्चमधील शिक्षणानंतर तिला एका ठिकाणी नोकरीही मिळाली. पिनेडोने नेस्लेसाठी काम सुरु केलं. त्यावेळीच तिची भेट वेबकॅम मॉडल जुआन बस्टोसोबत झाली. बस इथूनच तिने तिचं करिअर बदलण्याचा निर्णय घेतला. 

युडीने याबाबत सांगितले की, 'सुरुवातीला मला याबाबत वाईट वाटलं होतं. पण आता मी ठिक आहे. जेव्हा मी चर्चमध्ये जाते तेव्हा चांगलं वाटतं. मी कधीच शुक्रवारी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करणं आणि लोकांना भेटणं विसरत नाही'.

सुरुवातीला चर्चशी संबंधित लोकांनी युडीला हे करिअर निवडण्यास विरोध केला होता. पण युडी पिनेडाने त्यांचं ऐकलं नाही. आपल्या कामाबाबत युडी सांगते की, तिचं काम कलात्मक आहे आणि यात काहीही वाईट नाही.
 

Web Title: 8 years of training before becoming a nun, a sudden star turned out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.