स्वावलंबी आजी! 80 व्या वर्षीही जगण्यासाठी करावा लागतोय संघर्ष; कष्ट करून भरताहेत पोट; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 10:14 AM2021-07-29T10:14:01+5:302021-07-29T10:19:45+5:30
80 year old woman runs stall in amritsar watch viral video : एक 80 वर्षीय आजी कष्ट करून आपल्या पायावर उभ्या आहेत. स्वावलंबी जीवन जगत आहेत.
नवी दिल्ली - आयुष्यभर सर्वच जण कष्ट करत असतात. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वासाठी धडपडत असतात. वयाच्या 60 व्या वर्षानंतर काही जण निवृत्त होतात. पण काहींना जगण्यासाठी, आपलं आणि आपल्य़ा कुटुंबाचं पोट भरण्यासाठी वृद्धापकाळात संघर्ष करावाचा लागतो. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एक 80 वर्षीय आजी कष्ट करून आपल्या पायावर उभ्या आहेत. स्वावलंबी जीवन जगत आहेत. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ हे तुफान व्हायरल होत असतात. असाच सध्या आजींचा काम करताना एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
80 वर्षीय आजी फळांचा ज्यूस विकून आपला उदर्निवाह करत आहे. सोशल मीडियावर तुफान व्हायरल होणारा हा व्हिडीओ पंजाबच्या अमृतसरचा असल्याचं सांगितलं जात आहे. आरिफ शहा नावाच्या एका ट्विटर युजरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आजींचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानंतर तो व्हिडीओ अल्पावधीतच खूप व्हायरल झाला. अनेक मोठ्या मंडळींनी हा व्हिडीओ रिट्विट केला असून आजींच्या स्टॉलला भेट देऊन त्यांना मदतीचा हात द्या असं देखील म्हटलं आहे. कष्ट करणाऱ्या आजींचं सर्वत्रच कौतुक केलं जात आहे. अमृतसरमध्ये तिचा स्टॉल आहे.
Dear #Amritsar friends do stop by at her stall and help this sweet lady to earn her meals. Address below 👇🏼 https://t.co/ovK904WVa2
— JASMEEN DUGAL (@jasmeenGdugal) July 28, 2021
आजींचा व्हिडीओ शेअर करताना "ही 80 वर्षांची ही आजी अमृतसरमध्ये एक स्टॉल चालवते. ती आपल्या वृद्धापकाळात आपले पोट भरण्यासाठी आजी कष्ट करत आहे. ती काही वेळापासून ग्राहकांची वाट पाहत आहे. या आजीचा स्टॉल उप्पल न्यूरो हॉस्पिटलजवळ रानी दा बागेत आहे. कृपया त्यांच्या स्टॉलला भेट द्या, मदत करा जेणेकरून त्या काही पैसे कमवू शकतील" असं म्हटलं आहे. जस्मीन दुग्गल यांनीही हा व्हिडिओ शेअर केला तसेच "अमृतसरच्या प्रिय मित्रांनो, या आजींच्या स्टॉलवर थांबा आणि त्यांना त्यांचे पोट भरण्यासाठी हातभार लावा" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.