काय सांगता? 94 वर्षीय व्यक्तीने सांगितले दीर्घायुष्याचे रहस्य, डॉक्टरांनाही आवडला सल्ला...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 05:11 PM2023-11-11T17:11:00+5:302023-11-11T17:13:11+5:30

सध्या सोशल मीडिया दिवसेंदिवस प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालला आहे. सोशल मीडिया हे अनेकांच्या उपजीविकेचं साधनही झालं आहे. असाच एक व्हिडीओ सध्या ट्विटरवर प्रचंड व्हायरल होत आहे.

94-year-old man reveals secret advice live long healthy life watch viral video even doctors like... | काय सांगता? 94 वर्षीय व्यक्तीने सांगितले दीर्घायुष्याचे रहस्य, डॉक्टरांनाही आवडला सल्ला...

काय सांगता? 94 वर्षीय व्यक्तीने सांगितले दीर्घायुष्याचे रहस्य, डॉक्टरांनाही आवडला सल्ला...

Viral Video: ट्विटरवर @DrParulSharma1 या यूजरने एक शेअर केलेला व्हिडीओ धूमाकुळ घालतोय. डॉ.पारूल यांनी एका ९४ वर्षांच्या वयोवृद्ध आजोबांचा एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये ते आजोबा तरूणांना दीर्घायुष्यासाठी आवश्यक अशा टीप्स देताना दिसतायत. त्यांनी दिलेल्या हेल्थ टिप्सवर तुफान लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतोय.

एक वेळ असा होता जेव्हा लोक आपले आयुष्य शिस्तबद्ध पद्धतीने जगत होते. त्यामुळे ते वृद्ध असूनही निरोगी राहत. शिवाय त्या वेळच्या लोकांची आयुमर्यादा वाढत होती. पण आता बदलत्या काळानुरूप खाण्यापिण्यात आणि जीवनशैलीत मोठा बदल झाला आहे. पण तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधून थोडा वेळ आरोग्यासाठी काढा, त्यामुळे तुम्ही स्वत:ला फिट ठेवू शकता. कारण व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. निरोगी आरोग्यासाठी तसेच सदृढ शरीरीसाठी व्यायाम हा गरजेचा आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये या आजोबांनी तरूणांना व्यायाम करण्याचा कानमंत्र दिलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार दीर्घायुष्यासाठी व्यायाम करणं महत्वाचं आहे.

डॉक्टरांनी 94 वर्षीय वयस्क आजोबांना फिटनेस सीक्रेटबद्दल विचारल्यानंतर उत्तर देताना मी सुरुवातीपासून व्यायाम केलाय. त्यामुळे तंदुरस्त असल्याचं सिक्रेट त्यांनी सांगितलं.


तरुणांचा निरोगी आरोग्याचा कानमंत्र देताना आजोबा म्हणतात,  मी पहाटे ४ वाजता उठतो. दीड ते दोन तास योगा करतो. शिवाय मी अगदी साधे अन्न खातो. मी मांसाहार पण खूप कमी करतो. जास्त भांडू नका. ९ नोव्हेंबरला हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ लोकांना प्रचंड आवडत आहे. शिवाय बातमी लिहिली जाईपर्यंत त्याला ३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच अनेक नेटकर्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.


या व्हिडीओवर  नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. "माझ्या आजोबांनी कधी व्यायाम केला नाही, जंक फूड खाल्ले नाही, पण वयाच्या ९० व्या वर्षापर्यंत त्यांना कोणताही आजार नव्हता, अशी कमेंट एका ट्विटर यूजरने केली आहे. त्याचबरोबर आणखी एका युझरनं कमेंट करत सोशल मीडियावर लोक इतके अरेंज झाले आहेत, की ते फक्त बोटांनी व्यायाम करत असल्याचं म्हटलंय.

Web Title: 94-year-old man reveals secret advice live long healthy life watch viral video even doctors like...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.