Dance Video: ९४ वर्षांचा नवरा अन् ९१ वर्षांची बायको... जोडप्याचा भन्नाट डान्स झाला व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 05:53 PM2022-07-18T17:53:17+5:302022-07-18T17:53:59+5:30
तरूणाईलाही लाजवेल असा आजी-आजोबांचा उत्साह, त्यांचा डान्स पाहाच
Dance Video: एखादी गोष्ट करण्याची जिद्द असेल तर वय आड येत नाही असं म्हणतात. वास्तविक, काही लोकांसाठी वय फक्त एक संख्या असते. वयाने मोठे असूनही त्यांच्या जगण्यात तोच उत्साह दिसून येतो. काही लोक वयाची साठी किंवा सत्तरी ओलांडली तरीही तरूणांप्रमाणे जगता, नाचतात, गातात, मजा करतात. साधारणपणे वयाच्या ६०, ७० वर्षानंतर लोक काहीसे थकतात. नाच-गाणं तर दूरच, पण काहींना चालायलाही त्रास होतो. असं असताना सोशल मीडियावरील एक व्हिडीओ मात्र तुम्हाला आश्चर्यचकित केल्याशिवाय राहणार नाही. (viral on social media)
सध्या एका वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओ सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत आहे. सहसा वयाची नव्वदी (९०) ओलांडल्यानंतर मनुष्य ठराविकच कामे करू शकतो. पण व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक वृद्ध जोडपे छान धमाल-मस्ती करत नाचत आहे. तिशीतल्या तरूणांसारखे त्यांचे पाय डान्स करताना थिरकताना दिसत आहेत. पण थक्क करणारी गोष्ट अशी की, या व्हिडिओमधील पुरुषाचे वय आहे ९४ वर्षे आणि महिलेचे वय आहे ९१ वर्षे. पण नव्वदी पार केलेलं हे जोडपं तरूणांनाही लाजवेल असं डान्स करत आहे आणि त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
पाहा वृद्ध जोडप्याचा तरूणांनाही लाजवेल असा डान्स व्हिडीओ-
Aise jiyo zindagi
— Rupin Sharma (@rupin1992) July 17, 2022
Na umr ki seema ho
Na Umr ka ho bandhan.. pic.twitter.com/7UcTJb89rI
हा शानदार डान्स व्हिडीओ IPS अधिकारी रुपिन शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. सुमारे २ मिनिटांचा असलेला हा व्हिडिओ लोकांना खूप आवडत असून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. सामान्यत: लोकं नव्वदीपर्यंत अतिशय खंगून गेलेल असतात. त्यांता बहुतेक वेळ अंथरुणावर विश्रांती घेण्यातच जातो. पण जगात असे काही लोक आहेत, जे या वयातही अॅक्टिव्ह असतात. अशी जोडपी डान्स करताना तुम्ही क्वचितच पाहिली असतील. पण वरील व्हिडीओतील जोडप्याचा डान्स खरंच थक्क करणारा आहे. हा डान्स पाहून तेथील प्रेक्षकही टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन देताना दिसतात. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही नक्कीच या चिरतरूण आजी-आजोबांचं कौतुक कराल हे नक्की.