भलेभले चुकले, ९९ टक्के लोकं फसले; तुम्ही सांगा या फोटोत कुत्रा आहे की मांजर? पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 12:53 PM2022-01-07T12:53:26+5:302022-01-07T12:53:51+5:30
सोशल मीडियावर सध्या असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जे पाहून ९९ टक्के लोकं फसली आहेत
सोशल मीडियावर अनेकदा आपल्याला काही ना काही चॅलेंज दिल्याचं पाहायला मिळतं. हे चॅलेंज फोटो पाहून दिलं जातं किंवा व्हिडिओ पाहूनही देतात. बहुतांश वेळी आपल्याला असा काही फोटो पाहायला मिळतो त्यामुळे कन्फ्यूज होतो. कारण काही व्हिडीओ अथवा फोटोमध्ये जे काही दिसतं वास्तव्यात खरं काही भलतेच असल्याचं पाहायला मिळते.
९९ टक्के लोकं फसले
हे फोटो अथवा व्हिडिओ पाहण्यासाठी चपळ आणि चाणाक्ष्य नजरेची आवश्यकता असते. सोशल मीडियावर सध्या असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जे पाहून ९९ टक्के लोकं फसली आहेत. विश्वास बसत नसेल तर आम्ही दिलेला व्हिडीओ पाहा आणि सांगा यात कुत्रा आहे की मांजर? हा पण व्हिडिओ पाहून काही सेकंदात तुम्हाला याचं खरं चित्र दिसणार आहे.
या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला एका छतावर एक प्राणी बसलेला दिसतो. त्यानंतर कॅमेरा झूम करत पुढे नेला असता तुम्हाला छतावर कुत्रा बसल्याचं दिसून येते. ९९ टक्के लोकांना हा कुत्राच असल्याचं वाटतं. हा व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या लोकांनाही वाटतं की तो कुत्रा आहे. पण प्रत्यक्षात तसं काही नसतं.
पाहा व्हिडीओ
कॅमेरा झूम होताच चित्र स्पष्ट होतं
हा व्हिडिओ पाहिला की त्यात कुत्रा नसून मांजर असल्याचं दिसून येईल. जसजसं व्हिडीओत झूम केले जाते तसं मांजर मागे वळून पाहतं आणि सर्वकाही आरस्यासारखं स्पष्ट दिसून येते. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दिसेल की त्यात एक मांजर आहे ती छतावर बसलेली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. इन्स्टाग्राम viralhog वर हे शेअर केले आहे. युजर्सने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, कुत्रा आहे की मांजर? आपल्याला काय दिसतं? त्यावर लोकांनीही विविध कमेंट्स दिल्या आहेत.