रशियन मुलीशी लग्न करून अचानक घरी पोहचला १९ वर्षीय मुलगा; त्यानंतर जे घडलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 08:22 AM2023-03-17T08:22:46+5:302023-03-17T08:24:12+5:30
अनमोल अचानक अलोनाला घेऊन त्याच्या घरी जातो. घरचा दरवाजा उघडल्यानंतर आई समोर असते.
नवी दिल्ली - घरातल्या मुलानं किंवा मुलीने तुम्हाला न सांगता परस्पर लग्न करून जर घरी आले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? सध्या यूट्यूबवर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत हाच प्रकार पाहायला मिळाला आहे. ज्यात एका १९ वर्षाच्या मुलानं अचानक रशियन मुलीला बायको बनवून घरी आणलं. हे पाहून आई संतापली. तू मूर्ख आहेस, असं कुणी लग्न करून घरी येते का? असं ओरडत आईनं मुलाला फटकारलं. हा व्हिडिओ सोशल मीडियात सगळीकडे व्हायरल होत आहे.
या व्हिडिओत यूट्यूबर अनमोल वर्मा त्याची मैत्रिण इवा आणि रशियन मुलगी अलोनासह दिसतो. अनमोलने घरी कॅमेरा सेटअप केलेला असतो. जेणेकरून घरच्यांचे रिअल टाइम एक्सप्रेशन रेकॉर्ड करता येईल. त्याचवेळी अनमोल अलोनाच्या गळ्यात हार घालतो. स्वत:ही हार घालून अलोनाच्या गळ्यात मंगळसूत्र आणि डोक्यात सिंदूर भरतो. हे लग्न खरे वाटावे असं अनमोल करतो.
त्यानंतर अनमोल अचानक अलोनाला घेऊन त्याच्या घरी जातो. घरचा दरवाजा उघडल्यानंतर आई समोर असते. अनमोल म्हणतो की, मी या मुलीशी लग्न केलंय. आजपासून अलोना आपल्यासोबत राहील. तिची बॅगही त्याच्याबरोबर असते. अचानक मुलगा लग्न करून घरी आलेला पाहून आईला धक्का बसतो. आई संतापून म्हणते. तुला अक्कल आहे का? २ मिनिटे आत ये आणि हा कॅमेरा बंद कर. अनमोलची आई घडलेला प्रकार पाहून हैराण असते. घरात येऊन बोल, बाहेर तमाशा करू नको असं ती म्हणते.
मुलगा यूट्यूबवर व्हिडिओ बनवतोय हे पाहून आईला कुठेतरी प्रँक व्हिडिओ असल्याचा संशय येतो. तेव्हा अनमोल सांगतो की माझ्याकडे लग्नाचे डॉक्युमेंट्स आहेत. मी कोर्टात लग्न केले हे सांगत त्याने मैत्रिण इवाला कागदपत्रे दाखवण्यास म्हणतो. अनमोलची मैत्रिण इवा ही त्याच्या आईला या दोघांचे लग्न झालंय हे पटवून देण्याचा प्रयत्न करते. साक्षीदार म्हणून कोर्टात लग्नाच्या प्रमाणपत्रावर तिची सही असल्याचेही सांगते. अनमोलच्या आईचा या दोघांच्या लग्नावर विश्वास बसतो. त्यानंतर आई अनमोलला खूप ओरडते. ही जबाबदारी कशी उचलणार? अलोनाला विचारते. तू तुझ्या आई वडिलांना लग्नाबाबत सांगितलंय का? असा प्रश्नांचा भडीमार अनमोलची आई करते.
...अन् अखेर येतो ट्विस्ट
व्हिडिओच्या शेवटी अनमोल आईला सांगतो हा प्रॅंक व्हिडिओ आहे. तेव्हा हे ऐकून आई त्याला मारायला लागते. हे सर्व पाहून अलोना आणि इवा जोरजोरात हसतात. या व्हिडिओला यूट्यूबवर आतापर्यंत ४ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर यूझर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.