२ वर्षीय चिमुकलीच्या चाव्यामुळे विषारी सापाचा मृत्यू; दुधाच्या दातांनी घेतला बदला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 10:35 AM2022-08-14T10:35:19+5:302022-08-14T10:38:51+5:30

सोशल मीडियावर नेहमी काही ना काही भन्नाट गोष्टी व्हायरल होत असतात.

A 2-year-old girl killed a snake with her teeth and saved her life | २ वर्षीय चिमुकलीच्या चाव्यामुळे विषारी सापाचा मृत्यू; दुधाच्या दातांनी घेतला बदला

२ वर्षीय चिमुकलीच्या चाव्यामुळे विषारी सापाचा मृत्यू; दुधाच्या दातांनी घेतला बदला

Next

नवी दिल्ली : सोशल मीडियावर (Social Media) नेहमी काही ना काही भन्नाट गोष्टी व्हायरल होत असतात. काही गोष्टी तर अशा असतात ज्याच्यावर विश्वास देखील ठेवणे कठीण असते. सध्या एका चिमुकलीसोबत घडलेले अनोखे प्रकरण याचाच एक प्रत्यय आहे. कारण अवघ्या २ वर्षाच्या मुलीने आपल्या रक्षणासाठी विषारी सापाचा सामना केला आणि त्यामध्ये विजयही मिळवला. या चिमुकलीने केलेल्या धाडसी कृत्यामुळे तिचा जीव वाचला आहे. खरं तर झाले असे की या मुलीने स्वत:ला वाचवण्यासाठी दुधाच्या दातांनी सापाचा चावा घेतला (Toddler Bites Snake With Teeth) आणि आपला जीव वाचवला. 

लहानग्या मुलीला अशा अवस्थेत सर्वप्रथम तिच्या शेजाऱ्यांना पाहिले होते. मुलीने केलेला आरडाओरडा कानावर पडताच शेजाऱ्यांनी तिच्याकडे धाव घेतली असता तिच्या तोंडात मेलेला साप पाहायला मिळाला. यासोबतच तिच्या चेहऱ्यावर आणि ओठांवर सर्पदंशाच्या काही खुणाही होत्या. मुलीला लगेच सापापासून वेगळे करण्यात आले आणि उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. 
 
चिमुकलीच्या तोंडात साप
ही संपूर्ण घटना १० ऑगस्ट रोजी घडली असल्याचे बोलले जात आहे. तुर्कस्तानच्या बांगोल शहरात असलेल्या कांतार या छोट्याशा गावात ही घटना घडली. इथे २ वर्षीय मुलीला सापाने चावले असता दिला रूग्णालयात डमिट करावे लागले. हा साप जवळपास अर्धा मीटर होता असे जात आहे. त्याने मुलीच्या ओठांवर चावा घेतला होता त्यामुळे २४ तास मुलीला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. 

धाडसी कृत्यामुळे वाचला जीव 
दरम्यान, आता चिमुकलीची प्रकृती स्थिर असून तिला घरी सोडण्यात आले आहे. माहितीनुसार, ती खेळत असताना अचानक सापाजवळ पोहचली आणि सापासोबत खेळायला लागली. मात्र सापाने आपले रौद्ररूप धारण करून चिमुकलीचा चावा घेतला. यामुळे मुलीला राग आला आणि तिने सापाला आपल्या दातांनी जोरात चावा घेऊन यमसदनी धाडले. 


 

Web Title: A 2-year-old girl killed a snake with her teeth and saved her life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.