VIDEO:कबड्डीच्या लाईव्ह सामन्यात घडली दुर्घटना; मैदानातच गेला खेळाडूचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 04:21 PM2022-07-27T16:21:00+5:302022-07-27T17:14:31+5:30
तामिळनाडूतील परूंती येथील मणदिकुप्पम गावात कबड्डी खेळताना एका विद्यार्थ्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
चेन्नई : तामिळनाडूतील परूंती येथील मणदिकुप्पम गावात कबड्डी खेळताना एका विद्यार्थ्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लाईव्ह सामन्यातच खेळाडूचा जीव गेल्याचे दिसत आहे. २२ वर्षीय विमलराज सालेम हा जिल्ह्यातील एका खासगी महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी घटनेचा तपास करण्यास सुरूवात केली आहे.
मणदिकुप्पम गावात कबड्डीचे सामने भरवण्यात आले होते, जिथे मृत खेळाडू विरोधी संघाच्या कोडमध्ये गेला आणि परतत असताना अचानक त्याचा मृत्यू झाला. विमलराजला विरोधी संघातील खेळाडूंनी पकडण्याचा प्रयत्न केला असता तो बाद झाला आणि अचानक जमिनीवर पडला. तेव्हाच ही दुर्दैवी घटना घडली.
A 22-year-old student died of suspected heart attack while he was playing #Kabaddi at #Manadikuppam on Sunday night.
— Hate Detector 🔍 (@HateDetectors) July 26, 2022
The police said the deceased, #Vimalraj, was studying 2nd year https://t.co/Y3z8surDu2 Zoology in a private college in #Salem district.#TamilNadu#Cuddalorepic.twitter.com/NdAkMbi1eb
पोलिसांकडून तपास सुरू
व्हिडीओत पाहायला मिळत आहे की, जेव्हा विरोधी संघातील खेळाडूंनी विमलराजला घेरतात आणि तेवढ्यात एका खेळाडूचा पाय त्याच्या छातीला लागतो. पाय एवढ्या जोरात लागला की तो पुन्हा उठूही शकला नाही आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. मात्र विमलराजला हृदयविकाराला झटका आल्याने त्याचा जीव गेल्याचे बोलले जात आहे. नंतर त्याला इस्पितळात दाखल करण्यात आले. ही हत्या आहे की कोणाचा कट याची पोलीस चौकशी करत आहेत. दरम्यान ही घटना रविवारी २४ जुलै रोजी घडली असून विमलराजचा हृदयविकाराच्या झटक्यानेच मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.