४५ वर्षीय विवाहित पुरूष ३ मुलं असलेल्या विधवा महिलेच्या प्रेमात; गावकऱ्यांनी भरचौकात लावलं लग्न 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 04:29 PM2022-07-21T16:29:52+5:302022-07-21T16:30:45+5:30

सोशल मीडियावर बिहारमधील एका अनोख्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

A 45-year-old married man is married to a widow with 3 children by the villagers | ४५ वर्षीय विवाहित पुरूष ३ मुलं असलेल्या विधवा महिलेच्या प्रेमात; गावकऱ्यांनी भरचौकात लावलं लग्न 

४५ वर्षीय विवाहित पुरूष ३ मुलं असलेल्या विधवा महिलेच्या प्रेमात; गावकऱ्यांनी भरचौकात लावलं लग्न 

Next

मुझफ्फरपूर । 

सोशल मीडियावर नेहमी काही ना काही भन्नाट गोष्टी व्हायरल होत असतात. सध्या बिहारमध्ये देखील एक अनोखी घटना घडली आहे ते पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. कारण बिहारच्या मुझफ्फरपूर (Muzaffarpur)मधील गावकऱ्यांनी आपल्या कृत्यानं सर्वांचं लक्ष वेधलं. प्रेमाला वयाची कोणतीच मर्यादा नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचं पाहायला मिळालं आहे. ३ मुलांच्या विधवा महिलेचं लग्न ४ मुलं असलेल्या पुरूषासोबत लावण्यात आलं आहे. लक्षणीय बाब म्हणजे विधवा महिलेचं आणि एका ४५ वर्षीय पुरुषावर प्रेम असल्याचं कळताच गावकऱ्यांनी गावातील भरचौकात विवाह सोहळा पार पाडला. ही संपूर्ण घटना मुझफ्फरपूर जिल्ह्यातील कटरा पोलीस स्टेशन हद्दीतील ढेढौल गावात घडली आहे. सध्या या घटनेची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. 

दरम्यान, ४५ वर्षीय विवाहित पुरूषाचे ३८ वर्षीय विधवा महिलेचं प्रेम असल्याचं कळताच गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला. याशिवाय गावकऱ्यांनी या अनोख्या लग्नाचा व्हिडीओ चित्रीत करुन सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. 

विधवा महिलेवर जडलं प्रेम
दरम्यान, प्रेमीयुगुल एकाच गावातील रहिवासी आहेत. नवरदेव एतवारी मांझी हा ४ मुलांचा बाप आहे, तर नववधू रिता हिला तीन मुलं आहेत. सात वर्षांपूर्वी रिताच्या पहिल्या पतीचा मृत्यू झाला होता. रिता आणि एतवारी यांचे प्रेमकरण गावकऱ्यांना कळताच त्यांनी गावातील भरचौकात दोघांचे लग्न लावलं. या लग्नाला गावातील प्रमुख मंडळी, स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांना हजेरी लावली. एकमेकांच्या गळ्यात हार घालून या नवजोडप्यानं आपल्या नवीन आयुष्याची सुरूवात केली आहे.

Web Title: A 45-year-old married man is married to a widow with 3 children by the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.