नोकरी गेल्याने ती ढसाढसा रडली, त्यावर सीईओ म्हणाला... व्हायरल 'Video' चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 12:13 PM2024-01-17T12:13:00+5:302024-01-17T12:14:06+5:30
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तरुणी व्यक्त होताना दिसतेय.
Viral Video : एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीला कंपनीने अचानक डच्चू दिल्याने तिला अश्रू अनावर झाले. कंपनीने नोकरीवरून काढल्याने या तरुणीने व्हिडीओद्वारे तिचे अनुभव शेअर केले आहेत. ते सांगताना तिला अश्रू अनावर होतात. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असून त्याच्यावर संबंधित कंपनीच्या सीईओनेही आता प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अमेरिकेतील एका ब्रिटीश कंपनीतील पीएश नावाच्या मुलीला आपल्या एचआरचा फोन आल्यावर तिची नोकरी गेल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर स्वत: ची नोकरी गेल्यावर या तरुणीने व्हिडीओ बनवला आहे. त्याच्या माध्यमातून तिने आपल्या भावनांना वाव दिला आहे.
मी ऑगस्टमध्ये या कंपनीत नोकरीला सुरुवात केली. मी माझ्या टीममध्ये सर्वाधिक काम केले.सर्व असाइन्टमेन्टस वेळेवर पूर्ण केल्या तरी मला नोकरीवरुन काढण्यात आले. हे सांगताना तिला अश्रू अनावर होतात. तिचा हा ९ मिनीटांचा व्हिडीओ पाहून नेटकरी त्यावर व्यक्त होताना दिसत आहेत. अनेकांनी तर कंपनीच्या काराभारावर ताशेरे ओढले आहेत. हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांमध्ये संतापचा सुर उमटला आहे.
पाहा व्हिडीओ :
Getting fired is tough, but it’s important to handle it with dignity. Firing someone is also hard, requiring compassion and respect. Total disaster on both sides here. pic.twitter.com/ptEFQT0TTb
— SMB Attorney (@SMB_Attorney) January 12, 2024
या तरुणीचा व्हिडीओ इतका व्हायरल होत आहे की, त्यास सुमारे २१ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. इतकेच नाही तर कंपनीच्या सीईओने हा व्हिडीओ पाहणे माझ्यासाठी वेदनादायी आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.