समुद्रात फुल स्पीडनं धावत होती पर्यटकांनी भरलेली नाव, लाट येताच झटक्यात विखुरले लोक; पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 02:38 PM2023-05-02T14:38:41+5:302023-05-02T14:42:54+5:30

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, समुद्राच्या लाटेत नाव बुडते. यामुळे सर्वच पर्टक समुद्रात पडतात. यावेळी सर्वच लोक सुद्रातून पोहून किनाऱ्यावर जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

A boat full of tourists was running at full speed in the sea, people scattered in a flash as the wave came; Watch the VIDEO | समुद्रात फुल स्पीडनं धावत होती पर्यटकांनी भरलेली नाव, लाट येताच झटक्यात विखुरले लोक; पाहा VIDEO

समुद्रात फुल स्पीडनं धावत होती पर्यटकांनी भरलेली नाव, लाट येताच झटक्यात विखुरले लोक; पाहा VIDEO

googlenewsNext

पर्यटनस्थळांवर पर्यटकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अनेकजण  विविध प्रकारचे साहसी खेळ आयोजित करत असतात. यात पर्यटकही मोठ्या हिरिरीने भाग घेताना दिसतात. या दरम्यान अनेक वेळा दुर्घटना होऊन अनेक जण जखमीही होताना दिसतात. असा एका समुद्रकिनाऱ्यावर मस्ती करतानाचा पर्यटकांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यात पर्यंटक फुल स्पीड बोट राईडचा आनंद घेताना दिसत आहे.

समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक विविध प्रकारच्या साहसी खेळांमध्ये भाग घेताना दिसतात. यादरम्यान कुणी समुद्राच्या उंच लाटांवर स्वार होताना दिसतं तर कुणी अंडरवाटर विश्वाचा आनंद घेताना दिसतं. दरम्यान, एक व्हिडीओ समोर आला आहे, यात पर्यंटक आपली बोट पूर्ण वेगाने समुद्राच्या लाटांकडे नेताना दिसत आहे. यानंतर ती एका मोठ्या लाटेने उलटते.

उंच लाटेने बुडाली नाव - 
हा व्हिडिओ सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. ट्विटरवर @OnlyBangersEth नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक नाव फुल स्पीडमध्ये किनाऱ्याकडून समुद्रात जाताना दिसत आहे. ही नाव वेगाने लाटा कापत पुढे जाताना दिसत आहे. यानंतर अचानक आलेल्या लाटेत नाव उलटते.

शहारा आणणारा व्हिडिओ - 
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, समुद्राच्या लाटेत नाव बुडते. यामुळे सर्वच पर्टक समुद्रात पडतात. यावेळी सर्वच लोक सुद्रातून पोहून किनाऱ्यावर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. हा व्हडिओपासून सर्वच युजर्सच्या अंगावर शहारा उभा राहत आहे. तसेच समुद्रात अशा पद्धतीचे खेळ खेळणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे असल्याचेही अनेक युजर्सनी म्हटले आहे. आतापर्यंत हजारोवेळा हा व्हिडिओ बघितला गेला आहे.
 

Web Title: A boat full of tourists was running at full speed in the sea, people scattered in a flash as the wave came; Watch the VIDEO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.