चिमुकलीच्या पोटावरुन गेले कारचे चाक; सुदैवाने वाचला जीव, पाहा VIDEO...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 07:14 PM2022-10-21T19:14:02+5:302022-10-21T19:14:41+5:30

या व्हिडिओमध्ये एका लहान मुलीच्या अंगावरुन कार गेल्याचे दिसत आहे.

A car wheel went over the stomach of a child; Fortunately she saved , watch the VIDEO... | चिमुकलीच्या पोटावरुन गेले कारचे चाक; सुदैवाने वाचला जीव, पाहा VIDEO...

चिमुकलीच्या पोटावरुन गेले कारचे चाक; सुदैवाने वाचला जीव, पाहा VIDEO...

Next


आजकाल रस्त्यावर चालणे कठीण झाले आहे. कधी कोणत्या वाहनाचा अपघात होईल, सांगता येत नाही. विशेषत: ज्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा असते, त्या रस्त्यांवर अपघाताचे प्रमाणही जास्त आहे. रस्त्यावर असताना आपल्या मुलांचीही खास काळजी घ्यावी लागते, अन्यथा मोठा अपघात होऊ शकतो. अशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे. 

या व्हिडिओमध्ये एका लहान मुलीचा भीषण अपघात झाल्याचे दिसत आहे. पण, सुदैवाने तिचा यात जीव वाचतो. झाले असे की, एक मुलगी रस्त्यावर आपल्या छोटीशा सायकलवर खेळत असते, तेवढ्यात समोरुन एक कार येते आणि तिला उडवते. ही कार त्या चिमुकलीच्या अंगावरुन जाते. गाडीचे चाक तिच्या पोटावरुन जाते, पण चमत्कारिकरित्या मुलगी बचावते. 

पहा ही धक्कादायक घटना


हा धक्कादायक व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'जाको रखे सैया मार से ना कोई.' व्हिडिओ पाहिला नसता तर तुम्ही विश्वास केला नसता की, अशा भीषण अपघातात मुलगी वाचू शकते. 
 

Web Title: A car wheel went over the stomach of a child; Fortunately she saved , watch the VIDEO...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.