ऐकावं ते नवलच! १०३८ रूपयांचं जेवण आणि २.५ लाख रूपये टीप; महिला वेटर झाली मालामाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 12:01 PM2022-07-20T12:01:44+5:302022-07-20T12:03:07+5:30
सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही भन्नाट गोष्टी व्हायरल होत असतात.
पेनसिल्व्हेनिया: सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही भन्नाट गोष्टी व्हायरल होत असतात. काही गोष्टी तर अशा असतात की ज्यांच्यावर विश्वास ठेवणे कठीण असते. सध्या अशीच एक घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कारण अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथे एक अनोखी घटना घडली आहे जी सर्वांचेच लक्ष वेधत आहे. कारण इथे एका व्यक्तीने १०३८ रूपयांचे बिल झाले असताना महिला वेटरला तब्बल २ लाख ३९ हजार रूपये टीप म्हणून दिले आहेत. महिला वेटरला एवढी रक्कम मिळाल्याने तिला धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार मारियाना लॅम्बर्ट नावाच्या महिला वेटरसोबत घडला आहे, ही महिला अल्फ्रेडो पिज्जा कॅफेमध्ये काम करत आहे. ग्राहकांना जेवण देणे हे या महिला वेटरचे काम आहे. लॅम्बर्ट या महिला वेटरने सांगितले की, मागील महिन्यात एक व्यक्ती कॅफेमध्ये आला होता, ज्याने खाण्यासाठी Stromboli ची ऑर्डर दिली होती. विशेष म्हणजे या ऑर्डरचे बिल केवळ १०३८ रूपये झाले होते. मात्र त्या संबंधित व्यक्तीने महिलेला बिलासोबत टीप म्हणून २ लाख ३९ हजार रूपयांची रक्कम दिली. मला एवढी रक्कम दिल्याने धक्काच बसला होता. माझा माझ्यावरच विश्वास बसत नव्हता त्यामुळे मी हा प्रकार माझ्या इतर सहकाऱ्यांच्या कानावर घातला, असे महिला वेटरने सांगितलं.
अनोख्या 'टीप'ची रंगली चर्चा
महिला वेटरने टीपचा प्रकार सहकाऱ्यांना सांगितल्यावर त्यांनाही धक्का बसला. मात्र काही लोक या टीपला 'टीप ऑफ जीसस' या प्रकाराशी जोडत आहेत. ही मोहीम जवळपास ९ वर्षांपूर्वी चालू झाली होती. विशेष म्हणजे २०१५ मध्येही एक असाच प्रकार उघडकीस आला होता, जिथे एका बारटेंडरला आठ लाखांहून अधिक रूपयांची टीप मिळाली होती. तेव्हा त्या ग्राहकाचे बिल टीपच्या तुलनेत केवळ ३३ हजार रूपये इतके झाले होते.