बिबट्यासारखा दिसणाऱ्या कुत्र्याला बघून लोक अवाक्, फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 04:24 PM2022-02-25T16:24:07+5:302022-02-25T16:29:26+5:30
Titus Dog : एका रिपोर्टनुसार, या कुत्र्याचं नाव टायटस डॉग आहे आणि तो शिकारी नाही. हा जगातल्या सर्वात वेगळ्या पिटबुल डॉग आहे आणि असं म्हटलं जात आहे की हा पृथ्वीवर एकुलता एकच असा डॉग आहे.
काही प्राणी खूपच वेगळे असतात हे तर सर्वांनाच माहीत आहे. या फोटोत दिसणारा टायटस डॉगचच उदाहरण घ्या. पिटबुल डॉगबाबतही (Pitbull Dog) तुम्ही ऐकलं असेल की, ते किती खतरनाक असतात. तसाच हा टायटस डॉगही (Titus Dog) खतरनाक दिसतो. पहिल्यांदा पाहिलं तर टायटस एका बिबट्यासारखा दिसतो. पण मुळात तो एक कुत्रा आहे. पण टायटस डॉगबाबत फार कमी लोकांना माहिती आहे.
कुत्र्याच्या मालकाने सोशल मीडिया साइट रेडीटवर टायटसचे फोटो शेअर केले आहेत. जिथे त्याला ७ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत आणि हा टायटस डॉग त्याच्या वेगळ्या लूकमुळे व्हायरल झाला आहे. याप्रकरणी स्थानिक न्यूज एजन्सीने टायटसची कहाणी समोर आणली. बिबट्यासारख्या दिसणाऱ्या कुत्र्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पण या फोटोवर प्रश्नही विचारले जात आहेत.
Titus has the rarest markings for a pit. Very cool. #pitbull#dogsoftwitter#dogstyle#fff#dogsarelove#dogloverspic.twitter.com/QuKD0k55Qo
— Russell Scott⭐ (@FotosGab) February 29, 2020
एका रिपोर्टनुसार, या कुत्र्याचं नाव टायटस डॉग आहे आणि तो शिकारी नाही. हा जगातल्या सर्वात वेगळ्या पिटबुल डॉग आहे आणि असं म्हटलं जात आहे की हा पृथ्वीवर एकुलता एकच असा डॉग आहे. इतर कुत्र्यांच्या प्रजातीपेक्षा या कुत्र्याची प्रजाती फारच वेगळी आहे. कारण तो बिबट्यासारखा दिसतो. त्याचं दिसणं अवर्णनीय आहे. एक्सपर्ट सांगतात की, अशाप्रकारच्या म्यूटेशनला नॅच्युरल मानलं जात नाही. ते तयार करण्याच्या अनेक पद्धती आहेत. पण तरीही काही लोकांचं मत आहे की, पिटबुल डॉगवर काळे चट्टे लावण्यात आले आहेत.
— Amazing Physics (@amazing_physics) February 24, 2022
काही लोकांना वाटत आहे की, हा कुत्रा एका ग्रूमर सलूनमध्ये बसला आहे. इतकंच नाही तर फोटो बघून लोक अंदाज लावत आहेत की, टायटस डॉगवर शाईने डाग पेंट करण्यात आले होते. तर एकाने सांगितलं की, टायटस एक अल्बानियाई पिटबुल आहे. पण त्या कुत्र्यांची प्रजाती आता शिल्लक नाही.