Viral Leave Application: "बाप व्हायचंय सुट्टी द्या", कर्मचाऱ्याच्या अनोख्या अर्जाची सोशल मीडियावर रंगली चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 02:06 PM2022-08-15T14:06:17+5:302022-08-15T14:07:04+5:30
सोशल मीडियावर नेहमी काही ना काही भन्नाट गोष्टी व्हायरल होत असतात.
नवी दिल्ली : सोशल मीडियावर (Social Media) नेहमी काही ना काही भन्नाट गोष्टी व्हायरल होत असतात. नोकरी करत असलेल्या कर्मचाऱ्यांना वेळेवर सुट्टी मिळत नसल्याची अनेक वेळा तक्रार ऐकायला मिळते. त्यामुळे फिरायला जाण्यासाठी अथवा घरच्यांसोबत वेळ घालवण्यासाठी लोक भन्नाट युक्ती वापरून सुट्टी मिळवण्याचा प्रयत्न करतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका अनोख्या सुट्टीच्या अर्जाची मोठी चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या सुट्टीच्या अर्जाची नेटकरी खिल्ली उडवली असून काही मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सध्या चर्चेचा विषय बनलेल्या अर्जामध्ये बांगलादेशचा पत्ता लिहला आहे. ज्यामध्ये कर्मचाऱ्याने वडील होण्यासाठी त्याच्या ऑफिसमधून १-२ आठवड्यांची नाही तर तब्बल २ महिन्यांची सुट्टी मागितली. त्याला ६० दिवसांची रजा हवी असल्याचे त्याने अर्जात स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे सुट्टीचे कारण आणि ते लिहण्याची शैली सर्वांचे लक्ष वेधत आहे, "विझिट फॅमिली ॲंड मेक बेबी", असे कारण लिहून कर्मचाऱ्याने सुट्टीची मागणी केली.
कर्मचाऱ्याने मागितली २ महिन्यांची सुट्टी
लक्षणीय बाब म्हणजे हा सुट्टीचा अर्ज २०१७ मधील असल्याचा बोलले जात आहे, जो सध्या खूप व्हायरल होत आहे. अर्जामध्ये लिहल्यानुसार, कर्मचारी १५ नोव्हेंबर २०१७ ते १५ जानेवारी २०१८ पर्यंत ऑफिसमधून सुट्टी मागितली होती. हा व्यक्ती बांगलादेशमधील सिलट येथील असल्याचे अर्जातून समजते आहे. सध्या हा अर्ज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर काही युजर्संनी कर्मचाऱ्यांचे हे दु:ख असल्याचे म्हटले आहे.