अश्लील व्हिडीओ बनवणाऱ्या शिक्षिकेचा विद्यार्थ्यांनी केला पर्दाफाश; महिलेला द्यावा लागला राजीनामा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 01:29 PM2022-12-04T13:29:11+5:302022-12-04T13:29:38+5:30

हे सोशल मीडियाचे युग आहे, इथे कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही.

A female teacher was forced to resign from the school after students found out about her posting obscene videos on Only Fans  | अश्लील व्हिडीओ बनवणाऱ्या शिक्षिकेचा विद्यार्थ्यांनी केला पर्दाफाश; महिलेला द्यावा लागला राजीनामा 

अश्लील व्हिडीओ बनवणाऱ्या शिक्षिकेचा विद्यार्थ्यांनी केला पर्दाफाश; महिलेला द्यावा लागला राजीनामा 

googlenewsNext

नवी दिल्ली : हे सोशल मीडियाचे युग आहे, इथे कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळत असतो. संसाधनांची कमतरता माणसाला काहीही करण्यास भाग पाडते. मग लोक जे काम करणार आहेत ते चांगले की वाईट याचा विचार देखील करत नाहीत. त्यांना फक्त त्यांच्या गरजा पूर्ण करण्याची काळजी असते. असेच काहीसे एका शाळेतील शिक्षिकेने केले ज्याबाबत विद्यार्थ्यांना कळले असता या महिलेला राजीनामा द्यावा लागला. 

न्यूयॉर्क पोस्ट वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, स्कॉटलंडमधील रहिवासी ३३ वर्षीय कर्स्टी बुचान नरमन हायस्कूलमध्ये फिजिक्स विषयाची शिक्षिका होती. मात्र याच आठवड्यात तिला शाळेचा राजीनामा द्यावा लागला. कारण शाळेतील विद्यार्थ्यांनी तिचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो पाहिले होते, जे ती ओन्लीफॅन्स नावाच्या डल्ट सबस्क्रिप्शन साइटवर पोस्ट करायची.

ओन्लीफॅन्सवर टाकायची अश्लील व्हिडीओ 
डेली रेकॉर्डशी संवाद साधताना संबंधित महिलेने सांगितले, तिचा ११ वर्षांचा मुलगा खूप आजारी होता कारण त्याला पोटाचा त्रास होता. या कारणामुळे मुलावर शस्त्रक्रिया करावी लागली. शाळेतील नोकरीमुळे त्या महिलेला ना मुलावर उपचार करता येत होते ना घरचा खर्च भागवता येत होता. मुलाच्या जास्त बिलांमुळे संबंधित महिलेने अश्लील व्हिडीओ बनवण्यास सुरूवात केली आणि तिचे नग्न फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करण्यास सुरूवात केली. पूर्वी ती शाळेच्या कामात इतकी व्यस्त असायची तरी देखील तिचे घर चालत नव्हते.

लोकांच्या टीकेकडे केले दुर्लक्ष
विद्यार्थ्यांना शिक्षिकेच्या या कृत्याबद्दल माहिती मिळाली तेव्हा तिने राजीनामा दिला. मात्र संबंधित शिक्षिकेला याचा कोणताच पश्चाताप झाला नाही. शाळेतील अनेक शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी तिच्या निर्णयाचा आदर केल्याचे ही महिला सांगते. ती म्हणाली की हे तिचे शरीर आहे आणि ती त्याच्यासोबत जे काही करायचे ते करेल. लोक काय म्हणतात याची मला पर्वा नसल्याचे ही महिला सांगते. कारण या कामामुळेच आता तिचे घर सुरळीत चालू आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

Web Title: A female teacher was forced to resign from the school after students found out about her posting obscene videos on Only Fans 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.