आवडता फुटबॉल संघ मॅच हरल्याने तरुणाला झाला राग अनावर, धावत टीव्हीसमोर गेला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 03:01 PM2024-02-14T15:01:00+5:302024-02-14T15:03:45+5:30

दिवसेंदिवस सोशल मीडियाचे जाळे विस्तारत आहे.

a football lover  fan smashes TV after losing $20k bet on super bowl video goes viral on social media | आवडता फुटबॉल संघ मॅच हरल्याने तरुणाला झाला राग अनावर, धावत टीव्हीसमोर गेला अन्...

आवडता फुटबॉल संघ मॅच हरल्याने तरुणाला झाला राग अनावर, धावत टीव्हीसमोर गेला अन्...

Social Viral : हल्ली  सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा काही नेम नाही. लहानग्यांपासून ते वयोवृद्धापर्यंत प्रत्येकाला मोबाईलचे वेड आहे. पण या सोशल मीडियाचे जितके फायदे आहेत तितकेच तोटे देखील पाहायला मिळतात. त्याचा प्रत्यय हा व्हायरल व्हिडीओ पाहून येईल. 

जगभरात क्रिकेटप्रेमींप्रमाणेच फुटबॉल प्रेमींचींही काही कमी नाही. यासाठी लोक आपल्या आवडीच्या संघापासून ते प्लेअरसाठी वाट्टेल ते करायला तयार असतात. आपली टीम जिंकलीच पाहिजे, असा अट्टाहास त्यांचा असतो. जर एखादा चाहत्याला आवडणारी टीम स्पर्धेत हरली तर ते अपयश पचवणेही काहींसाठी अवघड होऊन बसते. 

सुपर बाऊल २०२४ ही रोमांकारी फुटबॉल मॅच कैनसस सिटी चीफ्स  आणि सैन फ्रांसिस्को 49ers  या दोन संघात झाली. अतीतटीच्या लढतीत कैनसस सिटी चीफ्सने सैन फ्रांसिस्को 49ers संघाला पराभवाची धूळ चारली. चीफ्स समर्थकांनी आपला संघ जिंकल्याने मोठा जल्लोष केला पण याउलट 49ers च्या चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला. त्याच दरम्यान टीव्हीवर या दोन संघांमधील मॅच पाहाणाऱ्या एका 
49ers समर्थकाला राग अनावर झाला. आपला आवडता संघ पराभूत झाल्याने  त्या रागात या फॅनने चक्क राहत्या घरातील टीव्ही फोडला. त्याने या खेळासाठी संघावर  20 हजार डॉलरची पैज लावली होती, त्यामुळे तो 49ers च्या पराभवामुळे नाराज झाला होता.  या व्हिडीओमध्ये त्या चवताळेल्या तरुणाला एक व्यक्ती शांत करताना दिसतोय. पण या तरुणाने रागाच्या भरात येऊन भींतीवर असलेला टीव्हीवर एका बुक्कीत फोडला. असं व्हिडीओतून स्पष्ट होतंय. 

सध्या सोशल मीडियावर या व्हिडीओची चर्चा आहे. तसेच या तरुणाचे हे कृत्य पाहून अनेकांनी डोक्यालाच हात लावला आहे.

Web Title: a football lover  fan smashes TV after losing $20k bet on super bowl video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.