काकूबाई रॉक्स नेटकरी शॉक्स! चक्क एलईडी टीव्हीची केली पाण्याने सफाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 11:53 AM2024-01-09T11:53:54+5:302024-01-09T11:55:27+5:30

महिलेवर चढला सफाईचा फिव्हर, चक्क एलईडी टीव्हीची करतेय पाण्याने सफाई.

A funny video of women clean LED tv by using water and foam  video goes viral on social media | काकूबाई रॉक्स नेटकरी शॉक्स! चक्क एलईडी टीव्हीची केली पाण्याने सफाई

काकूबाई रॉक्स नेटकरी शॉक्स! चक्क एलईडी टीव्हीची केली पाण्याने सफाई

Social Viral : हात फिरे तिथे लक्ष्मी वसे अशी एक म्हण आहे. स्वत: च्या शरीराच्या स्वच्छतेबरोबर आपल्या आजुबाजुचा परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. तरच आजारांपासून स्वत; चे संरक्षण करता येईल. स्वच्छतेची सवय अंगी बाळगणे हा एक महत्वाचा गुण आहे. काही लोक असेही असतात ज्यांना स्वच्छतेची प्रचंड आवड असते. पण मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका महिलेचा साफ-सफाई करतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही लोटपोट हसाल. 

सध्या सोशल मीडियावर स्वच्छतेचं फ्याड असणाऱ्या एका महिलेच्या व्हायरल व्हिडिओ बघताच नेटकरी अवाक् झाले आहेत. प्रत्येकाला आपल्या घरातील वस्तू साफ आणि स्वच्छ पाहिजे असतात. घरातील प्रत्येक वस्तू  स्वच्छ असावी याबाबत महिला अगदी कटाक्षाने लक्ष देतात. पण या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये या महिलेने केलेली कृती पाहून नेटकऱ्यांमध्ये एकच हशा पिकला आहे. ही थरारक सफाई पाहून तुमचं डोकं देखील चक्रावून जाईल.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक महिला तिच्या घरातील एलईडी टीव्ही साफ करण्यासाठी घराबाहेर येते.  एलईडी टीव्हीवरील धूळ साफ करण्यासाठी ही महिला चक्क पाण्याचा पाईपाद्वारे टीव्हीची सफाई करते. पाण्याचा फवारा मारत अगदी साबणाने टीव्ही धूण्यात महिला मग्न झालेली पाहायला मिळते. महागातला टीव्ही पाण्याने धुतल्यास त्याची काय अवस्था होईल हे त्या महिलेला का समजू नये. या महिलेच्या कृत्याने  अनेकांनी डोक्याला हात लावला.


पाहा व्हिडीओ - 

या मजेशीर व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. अरे, ही तर गोपी बहुची सासू वाटते , अशा गंमतीदार कमेंट्स नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. 

Web Title: A funny video of women clean LED tv by using water and foam  video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.