VIDEO : शेजारी असावा तर असा! स्वत:चे प्राण पणाला लावत आगीत अडकलेल्या चिमुकल्याचे वाचवले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 01:02 PM2024-05-16T13:02:47+5:302024-05-16T13:06:51+5:30
ब्राझीलमधील एका रहिवासी इमारतीतील आगीच्या दुर्घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.
Social Viral : शेजारधर्म ही सध्याच्या घडीला दुर्मिळ होत असली तरी अत्यंत महत्वाची गोष्ट समजली जाते. एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होणाऱ्या या शेजाऱ्यांसोबतच नातं म्हणजे सौदार्हपूर्ण आणि नेहमीच आंबट-गोड पद्धतीचं असतं.
पण शेजारधर्माची व्याख्या काळानूरूप बदलत चालली आहे. बिल्डिंगमधील प्रत्येक मजल्यावरील बंद दरवाजाने शेजारधर्म हा शब्दच संपुष्टात आणला आहे. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडिओ त्याला अपवाद ठरला आहे. या व्हिडिओमध्ये एका शेजाऱ्याने केलेल्या कृतीने अनेकांपुढे आदर्श ठेवला आहे. दरम्यान, ब्राझीलमध्ये एका बिल्डिंगच्या अपार्टमेंटमध्ये आग लागल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. त्या सोसायटीच्या चौथ्या मजल्यावर अडकलेल्या चिमुकल्याचा रेस्क्यू व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी कौतुकोद्गार काढलेत.
ब्राझीलमधील एका रहिवासी इमारतीतील आगीच्या दुर्घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. सकाळी ८ च्या सुमारास ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर आग लागल्याने फ्लॅटमधून आगीचे लोट बाहेर येताना दिसत आहेत. दुर्दैवाने या आगीमध्ये अडकलेल्या एका ६ वर्षाचा मुलगा अडकला होता. त्या मुलाची शेजाऱ्याने आपले प्राण पणाला लावून सूटका केली.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, ब्लिडिंगच्या ४थ्या मजल्यावर एका लहान मुलगा अडकलेला दिसतोय. जीवाच्या आकांताने ओरडत आपल्या मदतीसाठी तो हाक मारताना दिसत आहे. हा प्रकार लक्षात येताच अग्निशमन दलाच्या मदतीने त्याचा शेजारी अपार्टमेंटमधील गॅलरीतून सीढीच्या साहाय्याने त्या मुलापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतो. मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर तो माणूस आग लागलेल्या ठिकाणी पोहचण्यात यशस्वी होतो. मिळालेल्या माहितीनूसार, आगीचे लोट आणि धुराचा त्रास झाल्यामुळे त्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी या शेजाऱ्याचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
goodnews_movement या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हायरल व्हिडिओवर "The bravery shows bt those selfless men " अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तसेच दुसरा एक यूजर म्हणतो, "The neighbour is hero" अशी कमेंट त्याने केली आहे.