खाकी गणवेश, डोळ्यांना गॉगल कूल स्टाईलमध्ये दिसणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं नेमंक चालंलय काय? Video पाहा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 01:34 PM2024-02-12T13:34:57+5:302024-02-12T13:37:23+5:30

सध्या सोशल मीडियावर एका वाहतूक पोलिस अधिकाऱ्याचा एक जुना व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.

a kerla traffic police controlling traffic by his unique technique video goes viral on social media | खाकी गणवेश, डोळ्यांना गॉगल कूल स्टाईलमध्ये दिसणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं नेमंक चालंलय काय? Video पाहा 

खाकी गणवेश, डोळ्यांना गॉगल कूल स्टाईलमध्ये दिसणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं नेमंक चालंलय काय? Video पाहा 

Viral Video :  एखादा शहरी भाग असो अथवा ग्रामीण भाग, तेथील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी किंवा चालकांना शिस्त लावण्यासाठी पोलीस प्रशासन नेहमी सज्ज असते. सध्या सोशल मीडियावर एका वाहतूक पोलिसाचा जुना व्हिडीओ पुन्हा एकदा तुफान व्हायरल होत आहे. 

भर रस्त्यात अतरंगी शैलीत डान्स करत एक वाहतूक पोलीस अधिकारी वेगवेगळ्या  हरकती करताना  दिसतोय. वाहनचालकांचे मनोरंजन करत हा ट्रफिक पोलीस वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे. 

हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांमध्ये एकच हशा पिकला आहे. व्हिडीओमध्ये हा पोलीस हाताने दिशा दर्शवत वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याची ही लक्षवेधी स्टाईल अनेकांना भावली आहे. खाकी पोशाख, डोक्यावर टोपी तसेच डोळ्यांना गॉगल अशा अंदाजात हा पोलीस अधिकारी भर रस्त्यात उभा आहे.  अगदी रस्त्याच्या मधोमध उभा राहत तो वाहतूक कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय. 

माहितीनूसार, हा व्हायरल व्हिडीओ केरळमधील नॉर्थ परवूर येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. थलायवा स्टाईलने वाहनचालकांचे लक्ष वेधणारा पोलीस अधिकारी चर्चेचा मुद्दा बनत आहे. 


इंस्टाग्रमावर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओवर यूजर्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ,'बिग सल्यूट' , 'ट्रफिक पोलीस अधिकाऱ्याची कामाप्रती असलेली आत्मियता यातून दिसते', अशा कमेंट्स काहींनी केल्या आहेत. 

Web Title: a kerla traffic police controlling traffic by his unique technique video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.