VIDEO:"शिक्षक खूप अभ्यास देतात काय करू?, चिमुकल्या मुलीने केली थेट PM मोदींकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 01:01 PM2022-07-26T13:01:39+5:302022-07-26T13:02:46+5:30
एका लहान मुलीने व्हिडीओच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींकडे आपल्या शिक्षकांची तक्रार केली आहे.
नवी दिल्ली : सोशल मीडियावर नेहमी काही ना काही अनोख्या गोष्टी व्हायरल होत असतात. व्हायरल होणाऱ्या काही गोष्टी मनोरंजन करतात तर काही गोष्टी सर्वांनाच विचार करण्यास भाग पाडतात. सध्या एका चिमुकलीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहिल्यावर सर्वांनाच हसू आवरत नाही. मात्र व्हिडीओ पाहून लहानग्यांचा याबाबतीत खरोखर विचार व्हायला हवा असे काही युजर्संनी म्हटले आहे. कारण या व्हिडीओमध्ये एका लहान मुलीने आपले शिक्षक जास्त अभ्यास देतात अशी तक्रार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
"माझ्या शाळेतील शिक्षक खूप अभ्यास देतात त्यामुळे मला खेळायला वेळ मिळत नाही. एवढ्या लहान वयात एवढा अभ्यास त्यामुळे माझी आई देखील त्रस्त झाली आहे. या प्रकरणी माझ्या शिक्षकाशी बोलून मुलांना इतके काम देऊ नये असे त्यांना सांगा," असे आवाहन या मुलीने पंतप्रधानांना केले.
मुलीने केली थेट मोंदींकडे तक्रार
पंतप्रधान मोदींना आपल्या शालेय जीवनातील व्यथा सांगताना मुलीने म्हटले, हॅलो मोदीजी कसे आहात? माझे नाव अलीजा आहे. यानंतर मुलीने आपल्या शाळेतील शिक्षकांनी दिलेल्या अती अभ्यासाचा पाढाच वाचून दाखवला. सतत काम असते आणि त्यांना पण माहिती नसते की किती अभ्यास असतो. मोदीजी तुम्हीच मुलांना खेळण्याचा सल्ला देत असता मग आम्ही अशा स्थितीत कसे खेळायचे असे म्हणत चिमुकलीने व्हिडीओच्या माध्यमातून तक्रार केली.
Viral: बच्ची ने @narendramodi से की क्यूट सी अपील pic.twitter.com/7fWyZBQzuc
— @kumarayush21 (@kumarayush084) July 23, 2022
या लहान मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत. मुलीच्या भावना ऐकून सर्वजण तिचे कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ @kumarayush084 या अकाउंटवरून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. लहान मुलांच्या खाद्यांवर एवढ्या अभ्यासाचा ताण हा गंभीर विषय असल्याचे अनेक युजर्संनी म्हटले आहे. त्यामुळे मोंदीजींनी या चिमुकलीच्या तक्रारीची दखल घेतली पाहिजे कारण ही लहान मुले आपल्या देशाचे भविष्य आहेत, अशा विविध प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.