ऐकावं ते नवलच! वयाच्या ३१ व्या वर्षी झाला ४८ मुलांचा बाप; धक्कादायक कारण आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 10:55 AM2022-07-24T10:55:33+5:302022-07-24T10:56:32+5:30
अमेरिकेतील एका व्यक्तीने स्पर्म दान करून आतापर्यंत तब्बल ४८ मुलांना जन्म दिला आहे.
Serial Sperm Donor । नवी दिल्ली : अनेकवेळा सीरियल किलर आणि सीरियल किसर यांची भूमिका असलेले चित्रपट पाहायला मिळतात. अशी भूमिका असलेले कलाकार आपल्या अनोख्या आणि धाडसी व्यक्तीरेखेमुळे सर्वांचे लक्ष वेधतात. मात्र सीरियल स्पर्म डोनर याबाबत फारच कमी प्रकरणे समोर येत असतात. अशीच एक व्यक्ती स्पर्म डोनर म्हणून जगभर चर्चेत आली आहे. स्पर्म दान करून हा व्यक्ती आतापर्यंत तब्बल ४८ मुलांचा बाप झाला आहे. अलीकडेच त्याने दान केलेल्या स्पर्ममुळे ब्रिटनमध्ये एका मुलीचा जन्म झाला आहे.
स्पर्म दान सुरूच ठेवणार
या स्पर्म डोनरचे नाव कॅल गॉडी असे आहे. ३१ वर्षीय कॅल गॉडी अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहरात राहत असून तो अकाउंटंट म्हणून काम करतो. ४८ वेळा स्पर्न दान केलेला गॉडी म्हणतो की, इथून पुढे देखील स्पर्म दान करणार असून जोपर्यंत महिलांना याची गरज आहे तोपर्यंत हे सुरूच ठेवणार आहे.
ऑक्टोबर २०२१ मध्ये गॉडी युरोपीय देशांमध्ये फिरायला गेला होता, तिथे त्याने एका लेस्बियन कपलला स्पर्म दान केले होते. त्या महिलेने इंस्टाग्रामच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क साधला आणि स्पर्मची मागणी केली. २७ जून रोजी लेस्बियन कपलच्या घरी एका नवीन पाहुण्याचे आगमन झाले असून महिलेने गॉडीला बाळाचा फोटो पाठवला असल्याची माहिती गॉडीने दिली. पेशाने एक अकाउंटंट असलेल्या गॉडीने सांगितले की, "माझा एक मुलगा ब्रिटनमध्ये आहे हे ऐकून मला आनंद झाला आहे."
२०१४ पासून ही मोहीम सुरू
कॅल गॉडीने दिलेल्या माहितीनुसार, त्याने या अभियानाची सुरूवात २०१४ पासून केली आहे. सर्वप्रथम कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या एका लेस्बियन कपलला स्पर्म दान केले होते. डेटिंग आणि रिलेशनशिपममध्ये आपली फसवणूक झाल्याचे त्याने सांगितले, त्यामुळेच त्याने स्पर्म दान करण्यास सुरूवात केली. लक्षणीय बाब म्हणजे कॅल गॉडीने ज्या महिलांना स्पर्म दान केले आहे त्यांचा एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला असून यामध्ये जवळपास ४० महिलांचा समावेश आहे.