अरे बापरे! सेम-टू-सेम शर्ट घातला तर झाला 'Moye Moye' मजेशीर 'Video' व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 01:33 PM2024-01-16T13:33:13+5:302024-01-16T13:34:39+5:30

शर्टचा कलर सेम आहे, या कारणाने कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता निरपराध व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

A man wearing same colour tshirt beat by police man video goes viral on social media | अरे बापरे! सेम-टू-सेम शर्ट घातला तर झाला 'Moye Moye' मजेशीर 'Video' व्हायरल

अरे बापरे! सेम-टू-सेम शर्ट घातला तर झाला 'Moye Moye' मजेशीर 'Video' व्हायरल

Viral Video : सोशल मीडियावर दिवसागणिक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. काही व्हिडीओ नेटकऱ्यांचे निखळ मनोरंजन करणारे असतात तर काही व्हिडीओ बरंच काही सांगणारे असतात. प्रेरणादायी असणारे, कधी काळी लोटपोट हसवणारे तर कधी जीवनाचा सार सांगणारे व्हिडीओ यूजर्स सोशल मीडियावर व्हायरल होतात.  

अलीकडेच एक्सवर एका यूजरने शेअर केलेला व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी डोक्यालाच हात लावला. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या भामट्याच्या मागावर असलेल्या अधिकाऱ्यांनी भलत्याच माणसाला चोप दिला. ही घटना सीसीटीव्हीत कैद करण्यात आली आहे. 

पाहा व्हिडीओ:


या व्हायरल व्हिडीओमध्ये एक नारंगी रंगाचा शर्ट घातलेला व्यक्ती फोनवर गप्पा मारताना दिसतोय. त्याच क्षणी त्याच्या समोरुन अचानक सेम कलरचा शर्ट घातलेला माणूस धावत येतो. एक पोलीस कर्मचारी त्या भामट्या व्यक्तीच्या मागावर असल्याचं यात दिसतंय. त्या दरम्यान, हा व्यक्ती त्या भामट्या माणसाच्या मागावर असलेल्या पोलिसाच्या तावडीत सापडतो. कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता त्या पोलिस कर्माचाराने निरापराध व्यक्तीवर कारवाईचा बडगा उगारला. आपण ज्याचा पाठलाग करतोय तो गुन्हेगार हाच आहे ही गोष्ट न तपासता तो अधिकारी फोनवर बोलणाऱ्या माणसाला काठीने मारतोय. आपल्या हातातील काठीने त्या पोलिसाने विनाकारण त्या निष्कलंक माणसाला चोप दिल्याचं पाहायला मिळतंय.

व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्स केल्या आहेत. व्हिडीओ पाहून 'भाई के साथ Moye Moye हो गया', 'आजसे ऑरेंज शर्ट पहनना बंद' अशा मजेशीर प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

Web Title: A man wearing same colour tshirt beat by police man video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.