'दादाजी ने वाट लगा दी'! भारतातून पाकमध्ये आल्याचा पश्चाताप; महिला पत्रकाराचं ट्विट व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 11:06 AM2023-04-03T11:06:51+5:302023-04-03T11:17:31+5:30
पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी अनेकदा भारतीय वृत्तवाहिन्यांवरही दिसतात. पाकिस्तानमध्ये हिंदू मुलींवर अत्याचार होत असल्याचे त्यांनी अनेकवेळा मान्य केले आहे.
नवी दिल्ली - पाकिस्तान सध्या आर्थिक तंगीने हैराण झाला आहे. त्यात पाकिस्तानच्या महिला पत्रकार आरजू काझमी यांचं एक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मी हिंदुस्तानात राहणारी होते, पण माझ्या आजोबाने दिल्ली, प्रयागराजहून पाकिस्तानला पलायन केले आणि तिथेच वास्तव्यास राहिले. पाकिस्तानात मागील काही महिन्यांपासून आर्थिक परिस्थिती खालावली आहे. लोकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी रांगेत ताटकळत राहावं लागतंय. खाद्यपदार्थाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यातूनच आरजी काझमीने हे ट्विट केलंय अशी चर्चा आहे.
भारत सोडल्याचा होतोय पश्चाताप
आरजूने त्यांच्या पूर्वजांच्या १९४७ मध्ये भारतातून पाकिस्तानात येण्याच्या निर्णयाने पश्चाताप व्यक्त करत ट्विट केलंय की, माझ्या कुटुंबाला आणि मला वाटतंय पाकिस्तानात काही भविष्य नाही. माझे आजोबा आणि त्यांच्या कुटुंबानी भविष्यासाठी दिल्ली, प्रयागराज सोडून पाकिस्तानची वाट धरली होती. आजोबांनी वाट लावली. आरजूने केलेल्या ट्विटवर अनेक लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
भारतात या, लोकांनी दिले निमंत्रण
अफशान नावाच्या युजरने लिहिले की, 'माझे आजी-आजोबा बिहार आणि यूपीमधून पाकिस्तानात स्थलांतरित झाले होते आणि त्यांना त्यांच्या निर्णयाचा शेवटच्या श्वासापर्यंत पश्चाताप होत होता. तर 'मी चांगल्या प्रकारे समजू शकतो. माझ्या आजोबांनीही तेच केले आणि अखेर आमची परिस्थिती बिघडली असं समीर अहमद नावाच्या युजरने सांगितले. आरजूला उत्तर देताना जगदीश नावाच्या युजरने लिहिले, 'योगी जी घरवापसी करतील. काळजी करण्यासारखे काही नाही, अब्बा (भारत) यांचं मन खूप मोठं आहे असं मंजूर अहमद यांनी लिहिले. यानंतर अनेकांनी आरजूला भारतात येण्याचे निमंत्रण दिले. वाचा आरजू काझमीनं केलेलं ट्विट
कोण आहे आरजू?
पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी अनेकदा भारतीय वृत्तवाहिन्यांवरही दिसतात. पाकिस्तानमध्ये हिंदू मुलींवर अत्याचार होत असल्याचे त्यांनी अनेकवेळा मान्य केले आहे. त्याशिवाय तिने पाकिस्तानी लष्कर आणि सरकारचाही अनेकदा पर्दाफाश केला आहे. कराचीतील ट्रिनिटी मेथडिस्ट चर्चमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी प्रतिष्ठित पंजाब विद्यापीठातून पत्रकारितेत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यांचे वडील भारतातून (अलाहाबाद-प्रयागराज) पाकिस्तानात स्थलांतरित झाले होते. ते त्यांच्या काळातील एक प्रतिष्ठित पत्रकार देखील होते आणि त्यांच्या आईने अंबाला कॅंटमधून स्थलांतर केले होते. त्यांचे वडील सय्यद सलाहुद्दीन काझमी हे देखील पत्रकार होते आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल त्यांना १९९८ मध्ये पाकिस्तान सरकारकडून सुवर्णपदक मिळाले होते.