पोपटाने केली कमाल! चोचीत चम्मच धरला अन् झटक्यात बनवली कॉफी, VIDEO व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 03:25 PM2024-06-05T15:25:19+5:302024-06-05T15:30:13+5:30

इंटरनेटवर एका पोपटाचा व्हायरल होणारा व्हिडिओ चर्चेत आला आहे.

a parrot hold a spoon in beak and make coffee video goes viral on social media   | पोपटाने केली कमाल! चोचीत चम्मच धरला अन् झटक्यात बनवली कॉफी, VIDEO व्हायरल

पोपटाने केली कमाल! चोचीत चम्मच धरला अन् झटक्यात बनवली कॉफी, VIDEO व्हायरल

Social Viral : सोशल मीडिया हे एक आभासी जग आहे. मानवी जीवनच त्याने व्यापून टाकले आहे. माहितीच्या या महाजालाचा प्रभाव आता दिवसेंदिवस वाढतच चाललाय. सोशल साईट्सवर कधी, कुठे आणि काय पाहायला मिळेल हे सांगताच येत नाही. अशातच इंटरनेटवर एका पोपटाचा व्हायरल होणारा व्हिडिओ चर्चेत आला आहे. त्यात दिसणाऱ्या पोपटाची हुशारी पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. नेमका हा पोपट असं करतोय तरी काय? हे व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून तुम्हालाही कळेल. 

बोलणारे पोपट तर सगळ्यांनीच पाहिले असतील. मीटू मीटू करत घरी येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करणारा पोपट बरेच जण पाळतात. पोपटाला  जे काही आपण शिकवतो त्याचं तो अनुकरण करतो. बऱ्याचदा तो आपली नक्कलही करताना दिसतो. अशाच एका  हुशार पोपटाचा व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. पण व्हिडिओमध्ये दिसणारा पोपट कोणाची कॉपी नाही तर चक्क कॉफी बनवत आहे. 

व्हायरल व्हिडिओमध्ये हा पोपट आपल्या तोंडात चम्मच घेऊन कॉफी बनवताना दिसतोय. अगदी त्याला कॉफी बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया माहित आहे. आपल्या चोचीने कॉफीचे मिश्रण एकजीव करण्यासाठी पोपट आपल्या तोंडात एक चमचा पकडून तो कपमध्ये ढवळत आहे. पोपटाची ही चतुराई पाहून नेटकऱ्यांना नवल वाटलं आहे. या व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केल्याचं पाहायला मिळतंय. 

@Moj Clip नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या  व्हिडिओला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. तसेच या व्हिडिओवर " एक कप कॉफी आमच्यासाठी सुद्धा भाऊ" तसेच "दिसायला तर वेगळीच वाटतेय पण ट्राय करायला हरकत नाही" अशा गमतीदार प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 

Web Title: a parrot hold a spoon in beak and make coffee video goes viral on social media  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.