हे काय नवीन! हेल्मेट न घातल्याबद्दल कारमध्ये बसलेल्या व्यक्तीला दंड, दुप्पट रकमेचे चलन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 04:17 PM2022-12-27T16:17:20+5:302022-12-27T16:29:08+5:30
आपण कार किंवा बाईक चालवत असताना आपल्याला अनेक नियम लागू असतात. आपण ते नियम तोडले तर आपल्याला दंड होऊ शकतो.
आपण कार किंवा बाईक चालवत असताना आपल्याला अनेक नियम लागू असतात. आपण ते नियम तोडले तर आपल्याला दंड होऊ शकतो. रस्त्यावर कार, दुचाकी किंवा कोणत्याही प्रकारचे वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तुम्ही असे न केल्यास, पोलीस, वाहतूक पोलीस तुम्हाला दंड आकारतात.सध्या ऑनलाईन पद्धतीने चलन पाठवले जाते. सध्या सोशल मीडियावर एक चलन व्हायरल झाले आहे. यामध्ये हेल्मेट न घातल्यामुळे कारमध्ये बसलेल्या व्यक्तीचे चलन कापण्यात आल्याचे समोर आले आहे.
हे प्रकरण मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरातील आहे. ग्वालेरमध्ये एक कार ओव्हरस्पीडिंगसाठी थांबवण्यात आली. यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीचे चलन कापले. या तरुणाला पोलिसांकडून चलन स्लिप मिळाल्यानंतर ती सोशल मीडियावर व्हायरल केली आहे.या चलन स्लिपवर हेल्मेट न घातल्याबद्दल 250 रुपये दंड लिहिला होता आणि पोलिसांनी त्या व्यक्तीकडून 500 रुपये वसूल केले.
हा डान्स आहे की व्यायाम? बघा स्वत:च्याच लग्नात कशी नाचतेय ही नवरी, पाहून सगळेच म्हणाले.....
पोलिसांचा असा निष्काळजीपणा समोर आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले आहे. निष्काळजीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, जर चालान जारी करताना अशी चूक करणारी व्यक्ती दोषी आढळली तर त्याला निलंबित करण्यात येईल, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
जर तुम्ही कारने जात असाल आणि एखादा पोलीस तुमची कार ओव्हरस्पीडमध्ये आहे असे सांगून दंड करतात. पोलीस कर्मचाऱ्याला त्याच्या जवळच्या स्पीड टेस्टिंग मशीनमध्ये रेकॉर्ड केलेल्या कारचा वेग, कार किती वेगाने होती याबद्दल विचारले पाहिजे. पोलीस कर्मचाऱ्याकडे मशीन नसेल तर तो योग्य वेग सांगू शकत नाही. याशिवाय मशिनमध्ये जरी स्पीड आला तरी तुम्ही ज्या रस्त्याने चालत आहात त्याची वेगमर्यादा किती आहे हे कळायला हवे. त्यात तुमचा दोष नसला तरीही पोलिसांचे चुकीचे चालान कापले तरी त्याची तक्रार तात्काळ वरिष्ठांकडे करावी, तु्म्ही अगोदर त्या दंडाची शहानिशा केली पाहिजे, सध्या ऑनलाईन पद्धतीने चलन येत आहेत.