२०२३ च्या या ५ तारखांना मोठ्या घटना घडणार; भविष्याबाबत टाईम ट्रॅव्हलरचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 08:13 PM2023-01-27T20:13:53+5:302023-01-27T20:14:03+5:30

मंगळ ग्रहावर व्यक्तीच्या शरीराचे अवशेष सापडण्याची शक्यता आहे.

A self-proclaimed time traveller claimed that "human bones will be found on Mars | २०२३ च्या या ५ तारखांना मोठ्या घटना घडणार; भविष्याबाबत टाईम ट्रॅव्हलरचा दावा

२०२३ च्या या ५ तारखांना मोठ्या घटना घडणार; भविष्याबाबत टाईम ट्रॅव्हलरचा दावा

googlenewsNext

२०२३ च्या अखेरपर्यंत मंगळ ग्रहावर एका मानवी शरीराचे अवशेष सापडतील असा दावा एका रहस्यमय सोशल मीडिया यूजरनं दावा केला आहे. हा व्यक्ती स्वत:ला टाईम ट्रॅव्हलर सांगतो. हा २८५८ सालातून आला आहे. या व्यक्तीचं यूजरनेम डार्कनेस टाइम ट्रॅव्हल असे आहे. तो टिकटॉकवर अशाप्रकारेच व्हिडिओ बनवतो. एलिंयसपासून ते अंतराळापर्यंत सर्व विषयांवर, भविष्यात घडणाऱ्या घटनांबाबत तो सांगतो. टाइम ट्रॅव्हलर होण्याचा दावा करणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. 

या व्हिडिओत म्हटलंय की, मंगळ ग्रहावर व्यक्तीच्या शरीराचे अवशेष सापडण्याची शक्यता आहे. लक्ष द्या, मी २८५८ मधून आलोय, २०२३ मध्ये या ५ तारखा ध्यानात ठेवा, फेब्रुवारी २८ - प्रत्येकाला एक स्वप्न येईल त्यात शत्रू एलिंयसची टोळी पृथ्वीवर कब्जा करेल. मार्च ३० - एक विमान वार्महोलच्या माध्यमातून बेपत्ता होईल. प्रवाशांसाठी हा ६ सेकंदाचा वेळ असेल तर बाकी सर्वांसाठी ६ वर्षाचा. 

त्याने पुढे म्हटलंय की, ४ मे - मानवी शरीराचे अवशेष मंगळ ग्रहावर सापडतील. ज्यामुळे आपण सर्व मंगळ ग्रहावरील रहिवासी आहोत यावर विश्वास बसेल. २ जुलै - ६ व्यक्तींना सूर्याच्या ऊर्जेपासून सुपरपॉवर मिळणार. १९ ऑगस्ट - सरकारच्या टॉप सीक्रेट योजनांवर काम करणारे वैज्ञानिक पॅनेल यूनिवर्स एक पोर्टल उघडतील. हा व्हिडिओ टिकटॉकवर शेअर केला आहे. त्यावर लोकांनीही प्रतिक्रिया दिल्यात. एका यूजरने म्हटलं की, आपल्याला वास्तवात माहिती पडणार नाही, ते लपवले जाईल. तर मागील वर्षाची एकही भविष्यवाणी खरी ठरली नाही मी आजही वाट पाहत आहे असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. 
 

Web Title: A self-proclaimed time traveller claimed that "human bones will be found on Mars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.