Gujarat Shopkeeper Discount:दुकानदाराने जिंकली मने! १५ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला जवानांना दिली अप्रतिम ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 02:04 PM2022-08-14T14:04:23+5:302022-08-14T14:08:03+5:30
१५ ऑगस्ट २०२२ रोजी देश आपला ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे.
नवी दिल्ली : १५ ऑगस्ट २०२२ रोजी देश आपला ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. भारत सरकारकडून 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. या मोहिमेअंतर्गत देशभरातील नागरिक सोशल मीडियावर तिरंग्याचा फोटो आपल्या प्रोफाईल फोटोवर ठेवत आहेत. दरम्यान, गुजरातमधील एका दुकानदाराने भारतीय सैन्यातील जवानांना एक अप्रतिम ऑफर देऊन सर्वांची मने जिंकली आहेत. दुकानातील कोणतीही वस्तू खरेदी केल्यावर सैनिकांना ५० टक्के सवलत दिली जाईल, असे दुकानदाराने जाहीर केले आहे.
'हर घर तिरंगा' मोहिमेमुळे मिळाली प्रेरणा
भारतीय जवानांना खास ऑफर देणारे दुकान गुजरातमधील सुरत येथील आहे. दुकानदारांचे म्हणणे आहे की, पंतप्रधान मोदींनी केलेल्या 'हर घर तिरंगा' या मोहिमेत मी सहभागी झालो असून आमचे दुकान तिरंग्याने भरले आहे. यातूमच मला प्रेरणा मिळाली आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणखी रंगतदार व्हावा यासाठी आम्ही ही ऑफर देण्याचे ठरवले आहे, असे त्याने अधिक म्हटले.
जवानांसाठी ५० टक्के सवलत
या दुकानात कोणीही जवान आला तर त्याला मिठाईवर ५० टक्के सूट दिली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. ही ऑफर आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्समध्ये कार्यरत असलेल्या जवानांना असणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे निवृत्त झालेले जवान देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आपल्या सर्व शूर सैनिकांसाठी ही योजना लागू करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
"Also, if any Jawan comes to this shop, we will provide a 50% discount on sw eets for them. The officers from Army, Navy and Air Force will be given this offer. This scheme has been implemented for all our brave soldiers, even if they have retired," said the shopkeeper (13.08) pic.twitter.com/KphDumBCi4
— ANI (@ANI) August 14, 2022
देशभर स्वातंत्र्याच्या अमृतोत्सवाचा जल्लोष
भारत सरकारकडून स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देशभर अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवानिमित्त सरकारकडून 'हर घर तिरंगा' मोहिम राबवली जात आहे. देशभरातील विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी आपल्या प्रोफाईलवर तिरंगा लावून या अमृत महोत्सवात सहभाग नोंदवला आहे.