चोरी करण्यासाठी गेला, मोबाईल घेऊन पळही काढला, पण...; दुकानदाराच्या 'स्मार्ट ट्रिक'चं होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 01:31 PM2024-01-31T13:31:12+5:302024-01-31T13:33:40+5:30

सोशल मीडियावर व्हायरल होणारे काही व्हिडीओ हे नेटकऱ्यांच्या ज्ञानात भर घालणारे असतात तर काही व्हिडीओ लोकांना खळखळून हसवतात. 

A thief tried to steal mobile phones but faced a spectacular backfire when a locked door video goes viral in social media  | चोरी करण्यासाठी गेला, मोबाईल घेऊन पळही काढला, पण...; दुकानदाराच्या 'स्मार्ट ट्रिक'चं होतंय कौतुक

चोरी करण्यासाठी गेला, मोबाईल घेऊन पळही काढला, पण...; दुकानदाराच्या 'स्मार्ट ट्रिक'चं होतंय कौतुक

Viral Video : आजकाल चोरी, लूटमार किंवा फसवणूक केल्याच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. दिवसाढवळ्या दुकानांमध्ये किंवा घरांमध्ये घुसून चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याच्या घटना तुमच्याही कानावर पडल्या असतील. नुकताच सोशल मीडियावर एका चोराचा मोबाईल शॉपमधून चोरी करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांमध्ये एकच हशा पिकला आहे. यामागचं कारणही मजेशीर आहे.

चोरीची वेगवेगळी प्रकरणे आपल्या समोर येत असतात. त्यात या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये चोरी करुन पळताना चोराची कशी फजिती झाल्याची दिसून येत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये हा चोर एका मोबाईल शॉपमध्ये खरेदी करण्यासाठी आल्याचा बनाव करताना दिसतोय. आपल्याला मोबईल खरेदी करायचा असल्याचे दुकानदाराला भासवतो.

नेमकं प्रकरण काय?

यूकेच्या ड्यूसबरीमध्ये, एका चोराने मोबाइल फोन चोरण्याचा प्रयत्न केला. परंतु एका बंद दरवाजाने त्याला चोरलेला स्मार्टफोन दुकानदाराला परत करण्यास भाग पाडले. याचं कारण असं की, त्या दुकादनदाराने चोरीसारख्या घटना टाळण्यासाठी त्याच्या शॉपला रिमोट कंट्रोलिंग लॉक बसवले होते. मोबाईल चोरुन पळवाट काढणाऱ्या चोराची यामुळे चांगलीच कोंडी झाली. अखेरीस कोणताही पर्याय नसल्याने चोराने दुकानदाराला मोबाईल परत केला. हाती कोणतीही माहिती नसल्याने चोरट्याचे काही चालेल नाही. दुकानदाराच्या या युक्तीचे नेटकरी कौतुक करतायत. शिवाय या व्हायरल व्हिडीओवर लोकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केल्याचं पाहायला मिळतंय.

Web Title: A thief tried to steal mobile phones but faced a spectacular backfire when a locked door video goes viral in social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.