VIDEO:नदीवरील पुलावर चालत्या ट्रेनला लागली आग; जीव वाचवण्यासाठी महिलेने पाण्यात मारली उडी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 05:19 PM2022-07-22T17:19:39+5:302022-07-22T17:21:57+5:30
अमेरिकेतील बोस्टन येथे गुरूवारी एका ट्रेनला भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली.
बोस्टन : अमेरिकेतील बोस्टन येथे गुरूवारी एका ट्रेनला भीषण आग लागली. माहितीनुसार, ही ट्रेन मिस्ट्रिक नदीवरील पूल पार करत होती तेवढ्यात अचानक ट्रेनच्या डब्ब्यांना आग लागली. आगीच भडका होताच ट्रेनमधील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. ट्रेन नदीवरील पुलाच्या एकदम मध्यभागी होती आणि ट्रेनचे सर्व दरवाजे देखील बंद होते. अशा स्थितीत प्रवाशांना एमरजेंसी खिडकीचा वापर करून बाहेर पडावे लागले.
Wild video from inside the Orange Line train that filled with smoke this morning (shared with #WBZ by Jennifer Thomson-Sullivan). pic.twitter.com/OjrpE30T1B
— Liam Martin (@LiamWBZ) July 21, 2022
दरम्यान, ही धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ट्रेनला आग लागल्यामुळे एका महिलेने चक्क नदीत उडी मारली त्याचीही व्हिडीओ समोर आली आहे. नदीत उडी मारणारी महिला सुरक्षित असल्याचे अमेरिकेतील माध्यमांनी सांगितलं आहे.
New video shows a person in the water after an Orange Line train broke down and started smoking over the Mystic River.
— Rob Way (@RobWayTV) July 21, 2022
Riders had to climb off the train on to the tracks and walk back to the station. Witnesses say one person even jumped into the water. pic.twitter.com/Gvimj7krf9
Clear video of flames and smoke pouring from under the Orange Line train this morning in Boston. Passengers broke through windows to get to safety. (Video from John Gosselin) #WBZpic.twitter.com/5innaI5d5R
— Liam Martin (@LiamWBZ) July 21, 2022
आग लागल्याने २०० जणांचा जीव धोक्यात
ट्रेनला आग लागल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळताच बचाव कार्यासाठी घटनास्थळी अग्निशमक दलाची टीम दाखल झाली. माहितीनुसार जवळपास २०० लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. तर काही लोकांना आधीच ट्रेनमधून बाहेर पडण्यात यश आले होते. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, ट्रेनच्या गाडीतून ॲल्युमिनिअम साईडिंगसारखी धातूची पट्टी सुटली आणि वीजपुरवठा असलेल्या तिसऱ्या रेल्वेच्या संपर्कात आल्याने ट्रेनला आग लागली. यानंतर तिसऱ्या रेल्वेचा वीजपुरवठा तातडीने बंद करण्यात आला.