तहानेनं व्याकूळ असलेल्या उंटासाठी 'तो' बनला देवदूत; बाटलीने पाणी पाजून वाचवला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 02:48 PM2024-05-03T14:48:37+5:302024-05-03T14:54:14+5:30

तहानलेल्याला पाणी पाजणं हे एक पुण्यांच काम आहे. प्यायला पाणी नसल्यानं रखरखीत वाळवंटात मरणयातना सोसणाऱ्या एका उंटाला पाणी पाजणारा ट्रक ड्रायव्हर चर्चेत आलाय.

a truck driver save life of an camel by drunk him to water from bottle video goes viral on social media  | तहानेनं व्याकूळ असलेल्या उंटासाठी 'तो' बनला देवदूत; बाटलीने पाणी पाजून वाचवला जीव

तहानेनं व्याकूळ असलेल्या उंटासाठी 'तो' बनला देवदूत; बाटलीने पाणी पाजून वाचवला जीव

Social Viral : सध्या उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसेंदिवस सूर्य आग ओकू लागला आहे. याचा फटका मुक्या प्राण्यांना देखील बसत आहे. माणसांकडे यापासून बचाव करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. पण प्राणी-पक्ष्यांना घोटभर पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. जो पाहून काळजाचं पाणीच होईल. 

एका रस्त्यालगत तहानेने व्याकूळ असलेल्या उंटाला पाणी पाजण्याचं काम एक ट्रक ड्रायव्हर करतो. ज्याचा व्हिडिओ पाहून अनेकांनीच त्याचं तोंडभरून कौतुक केलं आहे. एक्सवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 या व्हिडिओमध्ये उष्माघाताचा त्रास होऊन प्यायला पाणी न मिळाल्यानं एक उंट जमिनीवर पडला होता. त्याच दरम्यान एक माणुस त्याच्यासाठी देवदूत बनून धावून आला. रस्त्यावरून जाताना तळपत्या उन्हात  मरणासुन्न स्थितीत पडलेल्या उंटाला पाहून तो ट्रकमधून खाली उतरतो आणि त्याला पाणी पाजतो.

त्याच्या या कृत्याने मुक्या जनावराचे प्राण वाचवले. व्हिडिओ पाहून अनेकजण भावूक झाल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडिओवर '' माणुसकी अजुनही जिवंत आहे तसेच पुण्यं कमावण्याचा यापेक्षा दुसरा चांगला पर्याय असुच शकत नाही'' अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 

Web Title: a truck driver save life of an camel by drunk him to water from bottle video goes viral on social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.