VIDEO: विरारमध्ये तीन महिलांनी दारू पिऊन घातला गोंधळ; पोलिसाच्या हाताचा चावा घेत गणवेशही फाडला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 02:55 PM2024-05-11T14:55:10+5:302024-05-11T14:57:15+5:30
सध्या सोशल मीडियावर मुंबईच्या विरारमधील एका घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
Social Viral :विरारच्या गोकुळ टाऊनशिप येथील पंखा फास्ट रेस्टारंट अॅण्ड बार येथे तीन महिलांनी दारू पिऊन गोंधळ घातला. अर्नाळा पोलिसांनी कायदेशीर कर्तव्य बजावताना अडथळा निर्माण करून दुखापत पोहोचवली म्हणून गुन्हा दाखल करत तिन्ही आरोपी महिलांना अटक केली आहे. याचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चर्चेत आला आहे.
महिला पोलिस अंमलदारासह इतर पोलीस अधिकारी व अंमलदार घटनास्थळी पोहोचले. येथे आरोपी महिलांनी त्यांच्याशी हुज्जत घालून शिवीगाळ करीत दमदाटी केली. त्यातील एका महिलेने महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या गणवेशाला पकडून ओढले आणि त्यांना धक्काबुक्की करून शर्टाची कॉलर पकडली. तिचा हात सोडवत असताना आरोपीने त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटाला व कोपराला जोरात चावा घेतला. या घटनेच्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
🚨Maharashtra: A surprising case has come to light in Virar. Here three drunk girls created a high voltage drama. Seeing the police, the girls started abusing and one girl even grabbed the policeman's uniform. #ATDigital#Maharashtra#Palghar#Virar#Crime#MaharashtraPolicepic.twitter.com/UitIdIWdSZ
— DESI KALESH ❤️ (@DESIKALESHH) May 9, 2024
मिळालेल्या माहितीनूसार, या मद्यपी महिलांनी काही कारणामुळे तेथील बारमधील अन्य ग्राहकांशी वाद घातला. या कारणामुळे त्यांना बारमधून बाहेर हकलण्यात आलं. बारमधून बाहेर निघताच या तिघींनी भररस्त्यात गोंधळ घातला. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांना धक्काबुक्की करत त्यातील दुसऱ्या आरोपी महिलेने लेडीज पोलीस कॉन्स्टेबलचे केस ओढले. या वादामध्ये पोलिस अंमलदार यांना सोडविण्यासाठी आलेल्या पंखा फास्ट रेस्टॉरंटमध्ये काम करत असलेल्या महिला सुरक्षा रक्षक महिलेला देखील धक्काबुकी करून तिचा टी-शर्ट फाडला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद करण्यात आली आहे.
तर तिसऱ्या आरोपी महिलेने देखील त्यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ व दमदाटी केली. या तिघींच्या ग्रुपमधील एकीने पोलीस हवालदाराच्या डोक्यात, खांद्यावर लोखंडी बादलीने मारून दुखापत करून त्यांच्या डाव्या हाताला मनगटाजवळ चावा घेऊन दुखापत केली.