अबब! चेन्नईत चक्क स्कूटीमध्ये आढळला ७ फुटांचा साप; व्हिडीओ पाहून अंगावर येईल काटा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 04:12 PM2023-12-14T16:12:01+5:302023-12-14T16:14:33+5:30
चेन्नईमध्ये मिचॉंग चक्रीवादळानंतर एका स्कुटीमध्ये अडकलेल्या सापाचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Viral Video: नुकताच सोशल मीडियावरचेन्नईमधील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून दुचाकीस्वारांच्या भूवया उंचावल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया येत आहेत.
गेल्या काही दिवसांआधी चेन्नईमध्ये मिचॉंग चक्रीवादळाने अक्षरश कहर माजवला होता. चेन्नई, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि आसपासच्या परिसराला पावसाने झोडपून काढले होते. मात्र आता चेन्नईतील पूरस्थिती नियंत्रणात आल्यानंतर एका स्कूटी चालकाने शेअर केलेला व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल.
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा काही अंदाज नाही. एका स्कूटीच्या हॅंडलच्या खालच्या भागात ७ फुटांचा साप आढळल्याने सोशल मीडियावर एकच खळबळ माजली. एवढा मोठा साप हा स्कूटीमध्ये नेमका कसा जाऊ शकतो? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी संभ्रमात आहेत. चेन्नईमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमध्ये स्वत: च्या बचावासाठी हा साप स्कूटीमध्ये जाऊन लपल्याचा अंदाज सर्पमित्रांनी व्यक्त केला.
व्हायरल व्हिडीओमध्ये स्कूटीमध्ये हा साप अंगाची घडी करून बसलेला दिसतोय. अखेर या सापाला सर्पमित्रांच्या साहाय्याने स्कूटीतून बाहेर काढण्यात येते. त्यानंतर या सापाला जंगलात सुरक्षितरित्या सोडल्याचे पाहायला मिळते आहे.
येथे पाहा व्हिडीओ :
VIDEO | Fire Department officials rescued a 7-foot-long snake coiled inside a scooter in Chennai. pic.twitter.com/oTuUOVSlXX
— Press Trust of India (@PTI_News) December 11, 2023