धावपट्टीवर धावत होते विमान, कॉकपिटमध्ये पायलटऐवजी बसले होते मूल, सुरत विमानतळावरील Video Viral
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 07:42 PM2022-10-14T19:42:41+5:302022-10-14T19:44:27+5:30
सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली : सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विमानाच्या कॉकपिटमध्ये पायलट सीटवर एक लहान मूल बसलेले दिसत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ सुरत येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडीओमध्ये 5 वर्षांच्या मुलाने पायलट सीटवर हेडसेट घातलेला आणि विमानाचे स्टीयरिंग व्हील पकडलेले पाहायला मिळत आहे. खरं तर मुख्य वैमानिक धावपट्टीवर उड्डाणासाठी दिशानिर्देश देत आहे. विमान धावपट्टीवर धावत असून नंतर टेक ऑफ करत असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
दरम्यान, व्यावसायिक विमानामध्ये कोणत्याही प्रवाशाला अगदी एअर होस्टेसला देखील परवानगीशिवाय कॉकपिटमध्ये प्रवेश दिला जात नाही. असे असतानाही व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पायलट सीटवर एक मूल दिसत आहे. अशा परिस्थितीत छोट्याशा चुकीमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.
सूरत: चलती विमान में पायलट की सीट पर लड़के के वीडियो से हड़कंप मच गया
— Prasoon Shukla 🇮🇳प्रसून शुक्ला🇮🇳राष्ट्र प्रथम (@prasoon001shukl) October 14, 2022
गुरुवार को एक चलती विमान के पायलट की सीट पर बैठे एक युवा लड़के का वीडियो वायरल हो गया। माना जाता है कि वीडियो सूरत हवाई अड्डे पर शूट किया गया था जब विमान उड़ान भर रहा था। pic.twitter.com/Wjm7SgmBmA
व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटले की, "चालत्या विमानात पायलटच्या सीटवर बसलेल्या मुलाच्या व्हिडीओने खळबळ उडाली आहे. गुरुवारी एका लहान मुलाचा चालत्या विमानात पायलटच्या सीटवर बसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. विमान टेक ऑफ करत असताना सुरत विमानतळावर हा व्हिडीओ शूट करण्यात आला होता." माहितीनुसार, कॉकपिटमध्ये बसलेले मूल एका राजकीय कुटुंबातील आहे. तसेच या घटनेबाबत डीजीसीएमध्ये तक्रार करण्यात आल्याचेही बोलले जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"