प्रेमी युगुलाला आली रोमान्सची 'लहर', मेट्रोमध्ये कपलनं केला कहर, video viral

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 04:35 PM2023-06-21T16:35:41+5:302023-06-21T16:36:07+5:30

दिल्ली मेट्रोतील प्रेमी युगुलाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

 A video of a couple romancing in Delhi Metro is going viral on social media  |  प्रेमी युगुलाला आली रोमान्सची 'लहर', मेट्रोमध्ये कपलनं केला कहर, video viral

 प्रेमी युगुलाला आली रोमान्सची 'लहर', मेट्रोमध्ये कपलनं केला कहर, video viral

googlenewsNext

delhi metro video : मागील काही दिवसांपासून दिल्लीमेट्रो खूप चर्चेत आहे. मेट्रोतील नवीन सुविधा याशिवाय अन्य काही कारणांमुळे दिल्ली मेट्रो सातत्याने माध्यमांमध्ये राहिली. दिल्ली मेट्रोतील अनोख्या घटना व्हायरल होत आहे. कधी डान्स तर कधी तरूणाईच्या रील्समुळे मेट्रोने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधले आहे. आता असाच एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून नेटकरी संताप व्यक्त करत आहे.
 
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, मेट्रोतील सीटवर एक कपल रोमान्स करताना दिसत आहे. हे सोशल मीडियाचं युग आहे, इथे कधी काय व्हायरल होईल आणि कोण कधी प्रसिद्धीच्या झोतात येईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. याचाच प्रत्यय या कपलच्या व्हिडीओवरून येत आहे. मेट्रोमध्ये रोमान्स करत असलेल्या या प्रेमी युगुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 

नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त 
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर नेटकरी संताप व्यक्त करत असून कारवाईची मागणी करत आहेत. सार्वजनिक ठिकाणी रोमान्स करणारी ही जोडी प्रसिद्धीसाठी कोणत्याही थराला जात असल्याचे नेटकरी म्हणत आहेत.

मात्र, दिल्ली मेट्रोने तपासाअंती म्हटले की, असे कोणतेही कपल आढळून आले नाहीत. दिल्ली मेट्रोने एका ट्विटला उत्तर देताना म्हटले, "गैरसोयीबद्दल क्षमस्व. पण हुडा सिटी सेंटरमध्ये तपासणी करताना असा एकही प्रवासी आढळून आला नाही."

Web Title:  A video of a couple romancing in Delhi Metro is going viral on social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.