Viral Video: आरारा खतरनाक! दारूच्या नशेत चढला झाडावर, नेटकरी म्हणाले, अशीही असते धुळवड?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 19:13 IST2023-03-08T19:12:31+5:302023-03-08T19:13:08+5:30
Holi Viral Video: देशभरात सर्वत्र होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

Viral Video: आरारा खतरनाक! दारूच्या नशेत चढला झाडावर, नेटकरी म्हणाले, अशीही असते धुळवड?
Holi 2023: देशभरात सर्वत्र होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात रंगांचा हा पवित्र सण साजरा केला जात आहे. जिथे एकीकडे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत एकमेकांना रंग लावताना दिसत आहेत. तर दुसरीकडे काही लोक दारूच्या नशेत होळीचा आनंद शेअर करताना दिसत आहेत. सध्या होळीच्या दिवशी दारू पिऊन झाडावर चढलेल्या व्यक्तीचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर होळी संबंधीचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. एकीकडे लोक रंगात भिजून एकमेकांना रंग लावत आहेत. तर दुसरीकडे होळीच्या निमित्ताने काही लोक मद्यधुंद अवस्थेत रस्त्याच्या कडेला किंवा नाल्यात पडलेले दिसतात. सोशल मीडियापर्यंत अशा लोकांचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून सर्वांनाच हशा पिकत आहे.
*#होलिकोत्सव की #बधाई, रुझान आना शुरू हो गए हैं* 🤣🤣 pic.twitter.com/bKn09oDGnv
— NamoBuddhay-sanatanayप्रचारक संस्कृतम्4_VED (@M4_VED) March 7, 2023
दारूच्या नशेत चढला झाडावर
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. ट्विटरवर @M4_VED नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती झाडावर चढून त्याची फांदी जोरात हलवताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की ती व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत आहे.
झाड हलताना पाहून असा भात होतो की, केव्हाही झाडाची फांदी तुटून संबंधित व्यक्ती खाली पडू शकते. त्याच वेळी, व्हिडीओमध्ये दिसते की, नशेत व्यक्ती झाडावर स्टंट देखील करू लागतो. जे पाहून सोशल मीडियावरील युजर्संनी त्याच्यावर टीका केली आहे. तर काही युजर्संनी मजेशीरपणे म्हटले की, "अशीही धुळवड साजरी केली जाते का?."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"