आरारा खतरनाक! बिपरजॉय वादळाचं पाकिस्तानात 'तुफान' रिपोर्टिंग; पत्रकारानं पाण्यात उडी मारली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 06:55 PM2023-06-14T18:55:44+5:302023-06-14T18:56:27+5:30
संपूर्ण देशात बिपरजॉय वादळाचे सावट पाहायला मिळत आहे.
Biporjoy in Pakistan : पाकिस्तानातील रिपोर्टर चांद नवाबने ईदच्या निमित्ताने केलेले रिपोर्टिंग आजतागायत सगळ्यांच्या लक्षात आहे. खरं तर आता संपूर्ण देशात बिपरजॉय वादळाचे सावट पाहायला मिळत आहे. त्यामुळे बहुतांश भागात परिस्थिती हाय अलर्टवर आहे. अशातच पाकिस्तानातील अशाच एका 'चांद' नवाबने आपल्या भन्नाट रिपोर्टिंगने सर्वांचे मनोरंजन केले. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अब्दुर रहमान असे नाव सांगणारा पाकिस्तानातील पत्रकार बिपरजॉय वादळाचे भन्नाट रिपोर्टिंग करताना दिसत आहे.
पाकिस्तानात देखील बिपरजॉयच्या पार्श्वभूमीवर खबरदारी बाळगली जात आहे. सिंधसारख्या प्रांतात वादळ तीव्र होण्याची शक्यता असल्याने लोकांना सुरक्षितस्थळी हलवले जात आहे. या वादळाचे रिपोर्टिंग करताना पाकिस्तानातील हा रिपोर्टर मुद्दामहून पाण्यात उडी मारतो अन् सर्वांचे लक्ष वेधतो.
In the meanwhile: #CycloneBiporjoy reporting from Pakistan pic.twitter.com/9NylcHtkmX
— Ghulam Abbas Shah (@ghulamabbasshah) June 14, 2023
या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की रिपोर्टर म्हणतो, "आज देखील समुद्र इतका खोल आहे की बोट कशी किनाऱ्यावर आणली आहे हे कॅमेरामन तुम्हाला दाखवेल. मी पाण्यात उडी मारून तुम्हाला सांगतो की पाणी किती खोल आहे आणि तुम्हाला किती खाली जावे लागणार आहे." यानंतर तो थेट पाण्यात उडी मारतो. तो उडी मारताच आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांना हसू अनावर होते. यानंतर तो बोटीच्या जवळ जातो आणि सांगतो की पाणी खूप खोल आहे. रिपोर्टर अब्दुर रहमानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडीओवर भन्नाट कमेंट करून त्याची फिरकी घेत आहेत.