विद्यार्थ्याने मुलीची छेड काढली! अन् शिक्षिकेने शिकवला 'संस्कारा'चा धडा, सर्वत्र होतंय कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 03:41 PM2023-01-25T15:41:49+5:302023-01-25T15:42:00+5:30
विद्यार्थ्याने मुलीची छेड काढली असता शिक्षिकेने त्याला चांगलाच संस्काराचा धडा शिकवला आहे.
नवी दिल्ली : एका विद्यार्थ्याने मुलीची छेड काढली असता शिक्षिकेने त्याला चांगलाच संस्काराचा धडा शिकवला आहे. खचाखच भरलेल्या वर्गात एका शिक्षिकेने विद्यार्थ्याला तुला आई बहिण नाही का? हा प्रश्न विचारला तेव्हा सगळेच अवाक् झाले. सध्या या धाडसी शिक्षिकेचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शिक्षिका अतिशय शांतपणे मुलाला समजावून सांगत असल्याचे पाहायला मिळत आहे. आपले कर्म आपल्याकडे परत येते, असे ती म्हणत आहे. आपण जे करतो ते आपल्या बाबतीत नक्कीच घडते.
खरं तर वर्ग सुरू झाल्यावर शिक्षिकेची नजर एका विद्यार्थीनीवर पडते. वर्ग खचाखच भरलेला होता, त्यामुळे तिला बसायला कुठेच जागा मिळत नव्हती. ती उभीच होती, शिक्षिकेने तिला बसायला सांगितले तितक्यात एका मुलाने तिला त्याच्याजवळ बसण्यास सांगितले. विद्यार्थ्याचा हेतू शिक्षिकेने ओळखला आणि तिने आपला संयम न गमावता मुलाला समजावून सांगायला सुरुवात केली. शिक्षिकेने मुलाला भरवर्गात विचारले की, "तुझ्या बहिणीला कोणी इथे येऊन बसायला सांगितले तर तुला आवडेल का?". त्यामुळे थोड्या मर्यादेत राहायला हवं ना? अशा शब्दांत शिक्षिकेने संबंधित मुलाला त्याच्या चुकीची जाणीव करून दिली.
टीचर की सोच को दाद देनी पड़ेगी, मुझे गर्व है, अपने भारत में ऐसे टीचर भी हैं।। pic.twitter.com/6oluzxkezC
— अधिवक्ता अतुल. कुमार. कुशवाहा (@Realatulin) January 24, 2023
शिक्षिकेचे सर्वत्र होतंय कौतुक
हे सर्व सांगताना शिक्षिकेच्या चेहऱ्यावरचे हावभाव एकदम शांत होते. मनात कोणताही राग न ठेवता तिने फक्त समजावण्याचा प्रयत्न केला. यामुळेच हा व्हिडीओ खूप पसंत केला जात आहे. याउलट वर्गातील मुलांचे गैरवर्तन पाहून शिक्षकांची अनेकदा चिडचिड होते. ते टोमणे मारतात आणि फटकारतात देखील. हा एक शॉर्टकट आहे. परंतु अनेक शिक्षकांना असे वाटते की त्यांनी मुलाला चांगले काय आणि वाईट काय ते समजावून सांगावे जेणेकरुन मूल स्वत: ठरवू शकेल. मात्र, हे सोशल मीडियाचे युग आहे. कधी आणि काय व्हायरल होईल हे सांगणे कठीण आहे. कारण प्रेरणा किंवा वेडेपणा दोन्ही लोकांचे लक्ष वेधून घेतात.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"