बिअरच्या बॉक्सने भरलेला ट्रक भररस्त्यात उलटला; मदत करण्याऐवजी बाटल्या घेऊन लोकांनी काढला पळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 05:58 PM2022-09-19T17:58:54+5:302022-09-19T17:59:44+5:30

बिअरच्या बॉक्सने भरलेला ट्रक पलटी होताच लोकांनी बाटल्या चोरून नेल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

A video of a truck full of beer boxes overturned and people stole the bottles is going viral | बिअरच्या बॉक्सने भरलेला ट्रक भररस्त्यात उलटला; मदत करण्याऐवजी बाटल्या घेऊन लोकांनी काढला पळ

बिअरच्या बॉक्सने भरलेला ट्रक भररस्त्यात उलटला; मदत करण्याऐवजी बाटल्या घेऊन लोकांनी काढला पळ

Next

नवी दिल्ली : अवजड वाहने मालाची वाहतूक करत असताना अनेकवेळा अति लोडमुळे अपघात होत असतात. अपघात झाल्यावर तिथे उपस्थित असलेले लोक मदतीसाठी पुढे येतात. पण सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात एक ट्रक भररस्त्यात उलटला आहे. ट्रक पलटताच लोकांनी त्या ट्रकच्या दिशेने धाव घेतली पण मदतीचा हात पुढे करण्यासाठी नव्हे, तर त्यात ठेवलेला माल चोरण्यासाठी. खरं तर बिअरच्या बॉक्सने भरलेला हा ट्रक उलटल्याचे दिसताच लोकांनी बिअरच्या बाटला चोरून नेण्यासाठी गर्दी केली. मदत करण्याऐवजी बाटल्या चोरणाऱ्या लोकांचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

सोशल मीडियावरील अकाउंट जस्ट हेजली थिंग्सने शेअर केलेला व्हिडीओ अनेकांचे लक्ष वेधत आहे. व्हिडीओमध्ये दक्षिण अमेरिकन देश कोलंबियाचे दृश्य पाहायला मिळत आहे. लोकांना बिअर किंवा इतर अल्कोहोलिक ड्रिंक्स आकर्षित करत असले तरी व्हिडीओतील प्रकार खूपच निंदणीय आहे. 

बिअर घेऊन लोकांनी काढला पळ 
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की ट्रक पलटी होताच बिअरच्या बाटला नेण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडते. खरं तर ट्रकमधील चालकाला मदत करण्याऐवजी बिअरच्या बाटला चोरण्यासाठी लोकांनी गर्दी केली. मात्र कोणीच ट्रक चालकाची विचारपूसही केली नाही याउलट बिअरचे बॉक्स घेऊन पळ काढला. काही लोक बॉक्स घेऊन रस्त्यावरून धावत आहेत तर काहींनी मोटारसायकलवरून बिअरचे बॉक्स लंपास केले. 

व्हिडीओवर लोकांनी दिल्या प्रतिक्रिया
लॅड बायबल वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना या वर्षी 15 ऑगस्टच्या सुमारास घडली. या व्हिडीओला 5 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने मजेशीर टिप्पणी करताना म्हटले की, भारतातील लोक फक्त बदनाम आहेत. ट्रक रिकामा करूनच लोक ट्रक ड्रायव्हरला मदत करत असतील अशीही हास्यास्पद प्रतिक्रिया एका युजरने दिली.


 

Web Title: A video of a truck full of beer boxes overturned and people stole the bottles is going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.