हास्यास्पद अन् संतापजनक! मेट्रोमध्ये महिलेचा एकच राडा; सीट न मिळाल्यानं तिनं...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 12:55 PM2024-03-14T12:55:27+5:302024-03-14T13:02:14+5:30
प्रसिद्धीसाठी तरूणाई मेट्रोचा आसरा घेत व्हिडीओ बनवत असते.
मेट्रोमधील भन्नाट, हास्यास्पद आणि संतापजनक व्हिडीओ हल्ली सातत्याने समोर येत असतात. प्रसिद्धीसाठी तरूणाई मेट्रोचा आसरा घेत व्हिडीओ बनवत असते, तर अनेकजण मेट्रोमध्ये डान्स करून लक्ष वेधतात. प्रसिद्धीसाठी कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पना न केलेलीच बरी... पण आता दिल्ली मेट्रोतील एक संतापजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक महिला सीट मिळावी म्हणून ज्या प्रकारे वाद घालते ते पाहून नेटकऱ्यांचा पारा चढला. अनेकांनी कमेंट्सच्या माध्यमातून तिला लक्ष्य केलं. दिल्ली मेट्रोमध्ये सीटवरून झालेल्या भांडणाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
खरं तर झालं असं की, मेट्रोमध्ये भरपूर गर्दी असते, बसण्यासाठी जागा नव्हती. अनेकजण उभं राहून प्रवास करत असल्याचं दिसते. इतक्यात एक महिला सीटवरून तरूणाशी वाद घालू लागली. जागा न मिळाल्यानं संतापलेली महिला थेट संबंधित तरूणाच्या मांडीवर बसली अन् अश्लील भाषा बोलू लागली. व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, महिला म्हणते की, मी निर्लज्ज होईन... पण मला काहीच हरकत नाही.
मेट्रोमध्ये हास्यास्पद थरार
सीटवर बसण्यासाठी एकही सीट खाली नव्हती. महिलेचा संताप पाहून एक व्यक्ती जागेवरून उठून गेला. मग महिलेनं सीटवर बसलेल्या तरुणाला तेथून उठण्यास सांगितलं. मात्र तरुणानं तसं करण्यास नकार दिला. यानंतर महिला जबरदस्तीनं त्याच्या मांडीवर बसली. महिलेला बळजबरीनं आपल्या मांडीवर बसवलेलं पाहून तिच्या शेजारी बसलेला व्यक्ती आपली जागा सोडून उठतो. यावेळी ती महिला म्हणते की, काहीही झालं तरी चालेल आम्ही निर्लज्ज होऊ... मला काय फरक पडणार आहे? मी इथेच बसेन, मला फरक पडणार नाही, फरक पडेल तो तुला... तेही रात्री.
This woke lady asked a boy to get up.
— ShoneeKapoor (@ShoneeKapoor) March 12, 2024
When he rightfully refused, she forcibly sat close to him, creating a scene.
Last time, I remember, this still counts as an #assault when done by a man.#delhimetropic.twitter.com/5wOtIJYD71
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी संबंधित महिलेवर कारवाईची मागणी केली. सार्वजनिक ठिकाणी असे वर्तन शोभते का असा प्रश्नही अनेकांनी विचारला. यापूर्वी देखील अशा भन्नाट आणि संतापजनक व्हिडीओ समोर आल्या आहेत. अनेकदा तरूणाई मेट्रोमध्ये रिल्स बनवताना दिसते, ज्यामुळं इतरांना त्रास सहन करावा लागतो.