मायेची ऊब! घरातून निघाला अन् इन्स्पेक्टर म्हणून परतला; लेकाला वर्दीत पाहून आईला आनंदाअश्रू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 06:00 PM2023-05-29T18:00:41+5:302023-05-29T18:01:14+5:30

जगभरातील लाखो तरुण आपले भविष्य घडवण्यासाठी घर सोडून जातात.

 A video of an emotional mother seeing her son become an inspector is going viral  | मायेची ऊब! घरातून निघाला अन् इन्स्पेक्टर म्हणून परतला; लेकाला वर्दीत पाहून आईला आनंदाअश्रू

मायेची ऊब! घरातून निघाला अन् इन्स्पेक्टर म्हणून परतला; लेकाला वर्दीत पाहून आईला आनंदाअश्रू

googlenewsNext

जगभरातील लाखो तरुण आपले भविष्य घडवण्यासाठी घर सोडून जातात. आपल्या भविष्याला आकार देण्यासाठी घराचा उंबरठा ओलांडून परक्या शहरात राहणाऱ्या तरूणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेक अशी उदाहरणं पाहायला मिळतात, जी येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी असतात. मनात बाळगलेले स्वप्न पूर्ण झाल्यानंतर जेव्हा ही 'पाखरं' आपल्या घरी परतात. तेव्हा तो क्षण त्यांच्यासह त्यांच्या घरच्यांसाठी अविस्मरनीय असतो. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, आपल्या मुलाचं यश पाहून त्या माऊलीला अश्रू अनावर होतात. ती मायेनं आपल्या लेकराला मिठी मारते. हा व्हिडीओ अशा एका मुलाचा आहे, जो घरातून मोकळ्या हाताने बाहेर पडला अन् इन्स्पेक्टर म्हणून परततो. आपल्या मुलाला वर्दीत पाहून त्याची आई आनंदाने वेडी झाल्याचे पाहायला मिळते.

 मायेची ऊब
सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेला हा १८ सेकंदांचा व्हिडीओ भावुक करणारा आहे. कोणीतरी दार ठोठावल्यावर आई घरातील कामात व्यस्त असल्याचे यात दिसून येते. आईला अजिबात कल्पना नव्हती की आपला मुलगा आला आहे. पण जेव्हा आपला मुलगा समोर दिसतो तेव्हा ती माऊली हळू हळू दरवाजाकडे पाऊलं टाकते. पण वर्दीत असलेला इन्स्पेक्टर मुलगा पाहून आईला रडू कोसळते. 

आईचा आनंद गगनात मावेना 
आपल्या मुलाला पोलिसांच्या वर्दीत पाहून आईचा आनंद गगनात मावत नव्हता. तिने आपले दोन्ही हात मोठ्या आनंदाने लेकाच्या डोक्यावर ठेवले. मुलगा जवळ आल्यावर आईने लगेच त्याला मिठी मारली.  

 

Web Title:  A video of an emotional mother seeing her son become an inspector is going viral 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.