कारखान्यात कसे बनवले जातात नूडल्स? ; व्हायरल Video मोठ्या धाडसाने बघा, नाहीतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 11:33 AM2023-01-20T11:33:39+5:302023-01-20T11:36:30+5:30
एका कारखान्यातील नूडल्स बनविण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली: पावसाळा असो कि उन्हाळा नूडल्स कोणाचेही मन खूश करण्यासाठी पुरेसे आहेत. तुम्ही घरच्या घरी काही मिनिटांत नूडल्स बनवू शकता किंवा उत्तम जेवणाच्या रेस्टॉरंटमध्ये त्यांचा आस्वाद घेऊ शकता. मात्र, या चविष्ट पदार्थाचा आस्वाद घेण्यापूर्वी हा व्हिडिओ तुम्हाला दोनदा विचार करायला लावेल. कारण तुम्ही असे नुडल्स खात असतील, तर त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो.
कारखान्यात नूडल्स सुरवातीपासून कसे बनवले जातात आणि कामगार योग्य उपकरणे आणि स्वच्छतेशिवाय, निष्काळजीपणे तयार करतात हे या व्हिडिओमधून दिसून येत आहे. हातांनी पीठ मळण्यापासून ते गलिच्छ डब्यात ठेवण्यापर्यंत आणि गलिच्छ जमिनीवर फेकण्यापर्यंत, क्लिपने स्ट्रीट फूडच्या आवडत्या, नूडल्स तयार होण्यामागील बाजू व्हिडिओद्वारे उघड केली. सदर व्हिडिओ ट्विटरवर खूप पाहिला जात आहे. तसेच व्हिडिओ पाहून विविध प्रतिक्रिया दिली देत आहे.
When was the last time you had road side chinese hakka noodles with schezwan sauce? pic.twitter.com/wGYFfXO3L7
— Chirag Barjatya (@chiragbarjatyaa) January 18, 2023
एका युर्जने "दिल्लीतील सर्व स्वयंपाकघरांमध्ये ही परिस्थिती आहे याची १०० टक्के खात्री आहे'', असं म्हटलं आहे. तर आणखी एका युर्जसने ट्विटद्वारे म्हटले आहे की, 'असो... हे नूडल्स उकळूननंतर तेलात तळले जातात, त्यामुळे मला खात्री आहे की, अशा उष्णतेमध्ये कोणताही जीवाणू जिवंत राहू शकत नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"