VIDEO: पिकअप चालकाचे नियंत्रण सुटले अन् गाडी चहाच्या दुकानात घुसली, भीषण दृश्य CCTVत कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 04:06 PM2022-12-20T16:06:32+5:302022-12-20T16:07:16+5:30

Viral Video On Social Media: पिकअप चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी चहाच्या दुकानात शिरल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

A video of the pick-up driver losing control and entering the tea shop is going viral  | VIDEO: पिकअप चालकाचे नियंत्रण सुटले अन् गाडी चहाच्या दुकानात घुसली, भीषण दृश्य CCTVत कैद

VIDEO: पिकअप चालकाचे नियंत्रण सुटले अन् गाडी चहाच्या दुकानात घुसली, भीषण दृश्य CCTVत कैद

googlenewsNext

नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. दुकानात चहा बनवला जात होता. काही लोक खाटेवर पडून मोबाईल पाहत होते, तर काही खुर्चीवर बसले होते. अशातच नियंत्रण सुटलेला पिकअप दुकानात शिरला आणि मोठी दुर्घटना घडली. खरं तर पिकअप यायच्या आधी सर्वकाही सुरळीत चालले होते मात्र अचानक गाडी दुकानात शिरते आणि एकच खळबळ माजते. गाडी आत येताच लोक इतरत्र धावू लागतात, पण पिकअप चालूच राहते अन् सगळ्यांची धाकधुक वाढवते. 

भीषण दृश्य CCTVत कैद 
हा भीषण अपघात दुकानातील एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला, ज्याने सोशल मीडियावरील युजर्सच्या अंगावर काटा आणला आहे. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की सर्व काही इतक्या वेगाने घडते की लोकांना पळून जाण्याची संधी देखील मिळत नाही. या दुर्घटनेत किती जण जखमी झाले आहेत, याची अद्याप माहिती समोर आली नाही. दरम्यान, ही घटना सुरतमधील असल्याचा दावा केला जात आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार हा अपघात 17 डिसेंबर रोजी झाला होता.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल 

सर्वांना चिंतेत टाकणारा हा व्हिडीओ @bhaiyaji25 या ट्विटर हॅंडलवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहले, "सूरत: असे सुद्धा अपघात होतात का…". सर्वांच्या अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला आहे. अपघाताचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने लिहिले, खूप भयानक. तर दुसर्‍याने लिहिले की आयुष्य असेच आहे, कधीही काहीही होऊ शकते. त्याच वेळी बऱ्याच युजर्संनी लिहिले म्हटले की मृत्यूला टाळणे अशक्य आहे.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: A video of the pick-up driver losing control and entering the tea shop is going viral 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.