प्रदुषण टाळण्यासाठी कोणते उपाय करावे? विद्यार्थ्याच्या उत्तराने नेटकऱ्यांना हसू अनावर, व्हायरल 'Answersheet' पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 13:40 IST2024-04-13T13:38:23+5:302024-04-13T13:40:33+5:30
सध्या इंटरनेटवर एका विद्यार्थ्यांने परीक्षेत पेपरमध्ये लिहलेल्या उत्तराचा जुना फोटो तुफान व्हायरल होत आहे.

प्रदुषण टाळण्यासाठी कोणते उपाय करावे? विद्यार्थ्याच्या उत्तराने नेटकऱ्यांना हसू अनावर, व्हायरल 'Answersheet' पाहा
Social Viral : सध्या सगळीकडेच वार्षिक परीक्षांच सत्र सुरू आहे. उत्तम मार्क्स मिळवून पुढच्या वर्गात जाण्यासाठी परीक्षेत पास होणं हा प्रत्येकासाठी मोठा टास्क असतो. सर्व इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा अत्यंत महत्वाची मानली जाते. काही मुलं अगदी मन लावून अभ्यास करत तयारी करून परीक्षेस बसतात. तर काही जण अभ्यास न केल्याने पेपरमध्ये काहीही लिहून येतात. अशाच एका विद्यार्थ्याने पेपरमध्ये वाढत्या प्रदुषणाच्या मुद्द्यावर लिहलेलं उत्तर वाचून तुम्हीही लोट पोट हसाल.
सोशल मीडियासारख्या अपडेटेड युगात कधी काय पाहायला मिळेल तसेच कधी कोणत्या गोष्टी कानावर पडतील सांगताच येत नाही. सध्या इंटरनेटवर एका विद्यार्थ्यांने परीक्षेत लिहलेल्या उत्तराचा फोटो तुफान व्हायरल होत आहे.
वाढत्या प्रदुषणाला रोखण्यासाठी कोणत्या गोष्टी करणं टाळलं पाहिजे असा प्रश्न त्या विद्यार्थ्याला विचारण्यात आला आहे. त्यावर या मुलाने लिहलेलं उत्तर वाचून नेटकऱ्यांनी डोक्याला हात लावला आहे. ''वाहनांमधून बाहेर निघणारा धूर, कारखान्यातून बाहेर सोडलेलं प्रदुषित पाणी तसेच जीवघेण्या हवेचे प्रमाण कमी करता आलं तर प्रदुषण टाळता येऊ शकतं,'' असं उत्तर त्याने लिहलंय. त्याखालोखाल लगेचच या अतिहुशार मुलाने 'बहुत प्यार करते है' हे हिंदी गाणं लिहून उत्तराचा शेवट केलाय. असं केलं तरच प्रदुषण रोखता येईल असं त्या मुलाचं म्हणणं आहे.
इन्स्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या पोस्टवर मोठ्या प्रमाणात नेटकरी व्यक्त झाले आहेत. ''यह बच्चा देश का भवितव्य तय करेगा'', ''Future ISS'' अशा मजेशीर कमेंट नेटऱ्यांनी या व्हायरल पोस्टवर केल्याच्या पाहायला मिळतायत.