चिमुकलीची कमाल! वयाच्या ६ व्या वर्षी रचला इतिहास; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 03:54 PM2024-04-23T15:54:22+5:302024-04-23T15:57:11+5:30
वयाच्या सहाव्या वर्षी चिमुकलीने केलेल्या पराक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Social viral : गुजरातच्या अहमदाबादमध्ये राहणाऱ्या तक्षवी वाघानीने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. हसण्या खेळण्याच्या वयात लिम्बो स्केटिंग करत तिने विश्व विक्रम रचला आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतोय. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड च्या माध्यमातून याची पुष्टी करण्यात आली आहे. नुकताच याचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलाय.
तक्षवीने लहान वयोगटामध्ये २५ मीटर लिम्बो स्केटिंग प्रकारामध्ये सहभाग नोंदवत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. या लहानग्या चिमुरडीने देशाची मान अभिमाने उंचावली आहे. गेल्या १० मार्चला तिने ही कामगिरी केल्याचं सांगण्यात येतंय.
एका भारतीय खेळाडूचा विक्रम मोडत तिचं नाव विश्व विक्रम करणाऱ्यांच्या यादीत सुवर्णाक्षरांना कोरण्यात आलं. पुण्यातील मनस्वी विशालचा रेकॉर्ड मोडत तिने ही कामगिरी बजावली. जमीनीपासून फक्त १६ मीटर ६.२९ इंच इतक अंतर राखून तक्षवीने स्केटिंग केल्याचं सांगण्यात येतंय.
New record: Lowest limbo skating over 25 metres - 16 cm (6.29 in) achieved by Takshvi Vaghani 🇮🇳 pic.twitter.com/X7tSafFSH9
— Guinness World Records (@GWR) April 18, 2024
या व्हिडिओमध्ये तक्षवीच्या शरीराची लवचिकता तसेच संतुलन पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. अवघ्या ६.९४ सेकंदात तिने लिम्बो स्केटिंग करत अंतर कापलं आहे. त्यामुळे देशाचं भविष्य असणाऱ्या लहानग्या तक्षवीवर जगभरातून स्तुतीसुमने उधळली जातायत.