VIDEO: टोल मागितला अन् राग आला; जेसीबीने टोल नाकाच तोडला; घटना सीसीटीव्हीत कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 04:01 PM2024-06-13T16:01:06+5:302024-06-13T16:07:44+5:30
टोल नाक्यावर वाहन चालक आणि टोल कर्मचारी यांच्यामध्ये अनेकदा वाद झाल्याचे आपण पाहतो.
Social Viral : टोल नाक्यावर वाहन चालक आणि टोल कर्मचारी यांच्यामध्ये अनेकदा वाद झाल्याचे आपण पाहतो. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये एका चालकाने टोल मागितल्यानंतर जे काही केले ते थक्क करणारे आहे.
महामार्गावरील दिल्ली-लखनौ छिजारसी टोल नाक्यावरून जाणाऱ्या बुलडोझर चालकाला टोलचे पैसे मागण्यात आले असता त्याने रागात टोलनाकाच बुलडोझरने तोडून टाकला आहे. यावेळी टोलनाक्यावर कर्मचारी केवळ बुलडोझर चालकाचा व्हिडीओ बनवत राहिले. तोच व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
This is Mohammad Sajid Ali's JCB bulldozer from Ghaziabad.
— Ashwini Shrivastava (@AshwiniSahaya) June 11, 2024
This JCB demolished two booths at the toll plaza, forcing the staff to flee for their lives when asked to pay the toll at Chhijarsi Toll Plaza, Hapur, Uttar Pradesh.
pic.twitter.com/QsKvWYPHTp
टोल व्यवस्थापक अजित चौधरी यांनी सांगितले की, जेसीबी चालक टोल नाक्यावरून जात होता. टोल कर्मचाऱ्यांनी त्यांना टोल मागितला असता त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि जेसीबीने दोन टोलनाके तोडले. यावेळी त्याने तेथे बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरेही तोडून टाकले. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलडोझर चालक टोलनाक्याची तोडफोड करत असताना त्याच्या व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद करण्यात आला.
टोलची तोडफोड करणारा बुलडोझर चालक आणि जेसीबी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एक्सवर @Ashwini Shrivatsava नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये जेसीबी चालकाचे हे कृत्य पाहून नेटकरी नाराज झाले आहेत. सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.