मासे खरेदी करणाऱ्या महिलेकडे पैशांऐवजी सेक्सची मागणी; 'या' देशात विचित्र ट्रेंड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 01:12 PM2023-05-01T13:12:16+5:302023-05-01T13:12:40+5:30
माशांच्या बदल्यात सेक्स हा व्यवहार या परिसरात वाढला कारण इथं मासे खरेदी करणाऱ्या महिला गरीब आहेत.
३ मुलांची आई जिच्या नवऱ्याचा मृत्यू झालाय. सातत्याने ३ दिवस मलावी सरोवरच्या ठिकाणी मासे पकडणाऱ्या परिसरात गेली जेणेकरून तिथे मासे खरेदी करता येईल. परंतु तिन्ही दिवशी महिलेला हाती निराशा आली. कारण तिथे मासे विकणाऱ्या व्यापाऱ्यांनी महिलेला माशाच्या बदल्यात सेक्सची मागणी केली. त्याला या महिलेने नकार दिला.
साल २०१८ च्या या घटनेची आठवण सांगताना कॅथरिन(बदललेलं नाव) सांगते की, मी ३ दिवस त्या मासेमारी करणाऱ्यांना नकार दिला. पण माझं आणि माझ्या मुलांचे जगणे कठीण झाले. मासेविक्री करण्याची मला गरज होती कारण तेच माझे उत्पन्नाचे एकमेव साधन होते. चौथ्यादिवशी मी पुन्हा त्या किनाऱ्यावर गेले. यावेळी तिथल्या व्यापाऱ्यांनी मला सेक्सची मागणी केली पण मी त्यांना नकार देऊ शकले नाही.
मलावी सरकारच्या २०२१ च्या वार्षिक आर्थिक रिपोर्टनुसार, मासे पकडणे आणि विकणे देशात ५० हजाराहून अधिक लोकांना रोजगार देते. देशाच्या एकूण उत्पन्नात मत्स्य व्यवसायाचा ४ टक्के वाटा आहे. अलीकडच्या काळात अत्याधुनिक मासेमारी आणि जलवायू परिवर्तनामुळे माशांचे प्रमाण कमी होत आहे असं तज्ज्ञांनी सांगितले.
उत्तरी मलावी येथील मजुजु विश्वविद्यालयात मत्स्य पालन आणि जलविज्ञानाचे प्राध्यापक फैनुएल कपुते म्हणतात की, मलावीच्या अशा जिल्ह्यात जे सरोवरच्या किनारी आहेत तिथे माशांऐवजी सेक्सची मागणी केली जाते. या परिसरातील लोकांच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन मासेमारी आहे. माशांच्या बदल्यात सेक्स हा व्यवहार या परिसरात वाढला कारण इथं मासे खरेदी करणाऱ्या महिला गरीब आहेत.
नोव्हेंबर, डिसेंबरच्या काळात माशांच्या बदल्यात सेक्सची मागणी वाढते. कारण त्याकाळात मासे खूप कमी प्रमाणात मिळतात आणि लोकांमध्ये स्पर्धा असते. २०१२ पासून याठिकाणी काम करणारे फ्रॅँक नखानी यांनी कधीही माशांच्या बदल्यात महिलांकडे सेक्सची मागणी केली नाही असं म्हटलं. पण काही मासे विक्री करणारे आहेत जे सेक्सची मागणी करतात अशी कबुलीही त्यांनी दिली. इतकेच नाही तर काही महिला स्वत: मासे विकणाऱ्या व्यापारांना पैशांऐवजी सेक्सची ऑफर देतात असा आरोपही त्यांनी केला.