स्पर्धेत जिंकण्यासाठी इतके खाल्ले की जागेवरच झाला स्पर्धकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 09:15 AM2024-09-14T09:15:18+5:302024-09-14T09:15:40+5:30
स्पर्धेदरम्यान, नॅटली स्टेजवर गुलाबी आणि पांढरे मार्शमॅलो खात होती, पण स्टेजवरून उतरताच ती बेशुद्ध झाली.
लोक स्पर्धा जिंकण्यासाठी जिवाची पर्वा न करता काहीही करायला तयार असतात. मात्र, अनेकदा ते जीवघेणेही ठरते. ब्रिटनमधील महिलेने स्पर्धा जिंकण्यासाठी इतके अन्न खाल्ले की यात तिचा मृत्यू झाला आहे.
३७ वर्षीय नॅटली बुस एका स्पर्धेत भाग घेण्यासाठी आली होती. ही स्पर्धा जिंकणाऱ्यांना बक्षीस म्हणून पैसे मिळणार होते. नॅटलीने तिच्या मुलाच्या १० वर्षांखालील रग्बी संघासाठी पैसे गोळा करण्यासाठी स्पर्धेत प्रवेश केला. स्पर्धेदरम्यान, नॅटली स्टेजवर गुलाबी आणि पांढरे मार्शमॅलो खात होती, पण स्टेजवरून उतरताच ती बेशुद्ध झाली. तिथे उपस्थित असलेल्या एका नर्सने तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचे प्रयत्न फोल ठरले. महिलेच्या निधनाची बातमी समजताच उपस्थित लोक भावुक झाले.