महिला पोलीस अधिकाऱ्याने अजमेर शरीफ येथील फोटो केला पोस्ट, लोक का संतापले?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 06:17 PM2023-01-31T18:17:12+5:302023-01-31T18:18:25+5:30

फोटोत असं नक्की काय होतं, त्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल झाल्या DSP अधिकारी

A woman police officer posted a photo from Ajmer Sharif why are people angry | महिला पोलीस अधिकाऱ्याने अजमेर शरीफ येथील फोटो केला पोस्ट, लोक का संतापले?

महिला पोलीस अधिकाऱ्याने अजमेर शरीफ येथील फोटो केला पोस्ट, लोक का संतापले?

googlenewsNext

Megha Goyal Dsp Ajmer Sharif: धार्मिक स्थळांवर होणाऱ्या यात्रेतील लोकांची संख्या लक्षात घेऊन मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला जातो. काही वेळा पोलिस अधिकारीही यात्रेत सहभागी होतात. अलीकडेच राजस्थानमधील अजमेर शरीफ येथे भरलेल्या यात्रेदरम्यान एका महिला DSP ने तिथून तिचा फोटो शेअर केला. हा फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोक अधिकाऱ्यावर संतापले.

'आईना ए अजमेर कुछ ऐसा अक्स दिखाता है'

मेघा गोयल असे या महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. मेघा गोयल या राजस्थान प्रशासकीय सेवेतील आरपीएस अधिकारी आहेत आणि जयपूरमध्ये डीएसपी म्हणून तैनात आहेत. त्यांनी अलीकडेच ट्विटरवर एक फोटो आणि एक व्हिडिओ शेअर केला आहे, त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'आयना अजमेर कुछ ऐसा अक्स दिखता है, जररा जरा आशिक ए ख्वाजा नजर आता है. ख्वाजाच्या प्रत्येक चाहत्याला उर्स मुबारक.' यासोबतच त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे.

त्यांनी हा फोटो शेअर करताच काही लोक त्या महिला अधिकाऱ्यावर संतापले. यावर एकाने कमेंट केली, "या महिला अधिकाऱ्याने इतर धर्माच्या उर्सचे फोटो का शेअर केले, त्यांच्यासाठी मंदिराचे दरवाजे बंद झाले आहेत?" एका युजरने तर तिचा हिंदू धर्मावर विश्वास नसल्याचंही लिहिलं आहे. अनेकांनी अशा गोष्टी लिहिल्या ज्यांचा उल्लेखही करता येणार नाही.

दरम्यान, मेघा गोयल यांच्या बचावासाठी काही लोकांनी कमेंट्स केल्या. काही लोक मेघा गोयल यांच्या मदतीला धावून आले. मेघा गोयल यांच्या बचावात एका युजरने लिहिले की, त्यांनी कोणतेही चुकीचे कृत्य केलेले नाही, त्या तिथे गेल्या म्हणून त्यांनी पोस्ट केली आहे आणि यात्रेचा फोटो शेअर केला आहे. यात काही गैर नाही. मेघा गोयल यांच्या समर्थनार्थ अनेकजण आपापली बाजू मांडतानाही दिसले.

Web Title: A woman police officer posted a photo from Ajmer Sharif why are people angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.