इंद्रदेवाविरोधात युवकाने घेतली पोलीस ठाण्यात धाव; चक्क देवाविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 06:18 PM2022-07-18T18:18:40+5:302022-07-18T18:23:15+5:30
पाऊस पडत नाही म्हणून उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने इंद्रदेवाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गोंडा : हे सोशल मीडियाचे युग आहे इथे कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही. सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही अनोख्या गोष्टी व्हायरल होत असतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीला काही समस्या असते तेव्हा ती व्यक्ती संबंधित पोलीस ठाण्यात धाव घेते. मात्र उत्तर प्रदेशातील गोंडामध्ये एका व्यक्तीने चक्क इंद्रदेवाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एवढेच नाही तर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणीही या व्यक्तीने अधिकाऱ्यांकडे केली आहे. सध्या या घटनेची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
माहितीनुसार, सुमित कुमार यादव नावाच्या व्यक्तीचे म्हणणे आहे की, ही वेळ भात लावणीची आहे, त्यामुळे देशातील काही भागातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र पावसाची चिन्हे नाहीत. पावसाअभावी शेतकऱ्यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. विशेष म्हणजे १७ जुलै रोजी परिसरात संपूर्ण समाधान दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला तहसील स्तरावरील अधिकाऱ्यांसह जिल्हास्तरीय अधिकारी देखील उपस्थित होते. झार गावातील रहिवासी सुमितकुमार यादव यांनी पाऊस पडत नाही म्हणून तक्रार दाखल केली आहे. खूप वेळ झाला पाऊस पडत नाही लोक प्रचंड नाराज असून याचा थेट परिणाम शेतीवर होत आहे. त्यामुळे याबाबत लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी असे पत्रात म्हटले आहे.
उत्तर प्रदेश (#UttarPradesh) के गोंडा जिले में सुमित कुमार यादव नाम के व्यक्ति ने तहसीलदार के पास 'भगवान इंद्र के खिलाफ शिकायत' दर्ज कराई है और बारिश में देरी के लिए उचित कार्रवाई की मांग की है। pic.twitter.com/T89InKTm4l
— IANS Hindi (@IANSKhabar) July 18, 2022
इंद्रदेवाविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान, आता हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे पत्र पाहून अनेक लोकांना धक्का बसला असून या व्यक्तीने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. तसेच कारवाईसाठी तक्रार पत्र तहसीलदार कर्नेलगंज यांच्याकडे पाठवण्यात आले आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावरील काही मंडळी हास्यास्पद टिप्पणी करत आहे. मात्र पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर असून त्यामुळे खर्च देखील निघत नसल्याचे तक्रारदार शेतकऱ्याचे म्हणणे आहे.